वृत्तपत्र कार्यालयास भारतीय संविधानाची प्रत भेट


सप्तरंगी साहित्य मंडळाचा उपक्रम; सर्व दैनिकांच्या कार्यालयास भेट देणार
 विश्वप्रभात  08 Oct 2024, 10:29 AM
   

नांदेड - भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरातील सकाळ विभागीय कार्यालयास भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली. यावेळी सकाळ समुहाचे उपसंपादक व बातमीदार गौरव वाळिंबे, वरिष्ठ बातमीदार शरद काटकर, बातमीदार शाम जाधव, जाहिरात प्रतिनिधी गजानन बिज्जेवार, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, कवी थोरात बंधू, शाहीर आ. ग. ढवळे, सामाजिक कार्यकर्त्या माया थोरात, एकनाथ कल्याणकर, सटवाजी माचनवार, संजय पाटील, सूनील दवणे यांची उपस्थिती होती.
              येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने लोकशाहीचा चौथा स्तंभ शहरातील दैनिक वृत्तपत्र कार्यालयास एक भारतीय संविधानाची प्रत भेट देण्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. भारतीय संविधान स्वतः प्रत अर्पण होण्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरातील सकाळ विभागीय कार्यालयास भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली. ही प्रत शरद काटकर यांनी स्विकारली. यावेळी थोरात बंधू यांची सुकन्या सामाजिक कार्यकर्त्या माया थोरात यांना सकाळ कार्यालयाकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

    Post Views:  47


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व