इंटरनॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांकावर अकोला


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  15 Mar 2022, 9:24 AM
   

अकोला : अकोला येथील जीनियस चॅम्प प्रोअॅक्टीव अबॅकस वर्गातील 18 विद्यार्थी हे ऑनलाईन इंटरनॅशनल फायनल कॉम्पिटिशन ला बसलेले होते. ही कॉम्पिटिशन एकूण 16 देशांमिळून  झालेली होती. एकूण 4 हजार 500 विद्यार्थी या कॉम्पिटिशन ला बसलेले होते. त्यामध्ये अकोल्यातील 18 विद्यार्थी हे चांगले यश मिळवून त्या कॉम्पिटिशन मध्ये विनर आलेले आहेत, तर एक विद्यार्थी हा  सर्व 16 देशांमधून प्रथम आलेला आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम हा दि. 13 मार्च 2022 रोजी श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथील इंग्रजी विभाग कॉन्फरन्स हॉलमध्ये 4 वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अविनाश दादा नाकट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रम हा प्रा. डॉ. विवेक हिवरे सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कॉम्पिटिशन मध्ये प्रथम आलेला भूषण दीपक निनोरिया याला  प्रथम पारितोषिक म्हणून सायकल व ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली, तसेच 3rd  रँक मध्ये आलेली अंजली तायडे हिला मान्यवराच्या हस्ते ट्रॉफी व स्टडी टेबल हे गिफ्ट देण्यात आले, रँक मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आसावरी मालटे  ला ट्रॉफी सोबतच प्रोऍक्टिव्ह अबॅकस कंपनी तर्फे 1 हजार रुपयांची स्कॉलरशिप देण्यात आली, रँकिंग चे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मयुर टाकर्डे, प्रणिता बुंदेले, वेदिका इंगळे, इशांत गणवीर, मोहम्मद उजेफ,  कासिफ खान, आरव शित्रे, वीर उके, आरोही रंगारी, दर्शन गणवीर, आदित्य यादव, कंचन बुंदेले, दिक्षिता पाटील, आदित्य काळे व विवेक मालोकार या विद्यार्थ्यांना मिळालेल्या ट्रॉफीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अबॅकसच्या शिक्षिका सौ दीपा राहुल देवर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार हे केंद्रचालक राहुल अशोकराव देवर यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांची उपस्थिती ही विशेष बाब होती. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले अबॅकसचे शिक्षक शिक्षिका व पालकांना दिले.

    Post Views:  392


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व