स्वातंत्र्य दिनी मुख कर्करोग व उपचार मार्गदर्शन शिबीर
लोकसेवा संघ व जीपीए अकोला यांचा सेवाभावी उपक्रम
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
08 Aug 2023, 7:29 PM
अकोला - लोकसेवा संघ व जीपीए अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट २०२३ र रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत डॉक्टर योगेश आर साहू यांच्या सुपरस्पेशालिटी डेंटल केअर सेंटर प्राणदाय मेडिकलच्या वर रतनलाल प्लॉट चौक, अकोला येथे निशुल्क मुख -कर्करोग निदान व उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .या शिबिरात वारंवार तोंड येणे, तोंडातील पंधरा दिवसाच्या वर असलेली न भरलेली जखम, गाठ, जीभेवरची गाठ, तोंडात तिखट लागण, तोंड कमी उघडणे व तंबाखूच्या विळख्यातून सुटका मिळवण्यास इच्छुक असा लोकांनी निदान मार्गदर्शन व उपचारासाठी लाभ घ्यावा. डॉक्टर योगेश साहू यांच्या रतनलाल प्लॉट, स्थित दवाखान्यात भारतातील पहिले तंबाखू प्रतिबंधात्मक केंद्र असून मागील २६ वर्षापासून ते लोकांना निशुल्क मार्गदर्शन करून हजारो लोकांची तंबाखूच्या विळख्यातून सुटका केली आहे. या शिबिराचे आयोजन डॉक्टर योगेश आर.साहू, अध्यक्ष -लोकसेवा संघ व डॉक्टर सुनील बिहाडे अध्यक्ष -जीपीए अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे, तसेच या शिबिरात डॉक्टर योगेश आर .साहू (दंत व मुख शल्य तज्ञ) व त्यांची पत्नी डॉक्टर सौ.रेखा योगेश साहू (दंत व मुख शल्य तज्ञ) आपली सेवा प्रदान करतील
Post Views: 174