बुलढाणा येथे पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी


संग्रामपूर तालुक्यातील सर्वत्र पत्रकारांनी तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन तामगाव यांना दिले निषेध निव
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  13 Feb 2023, 6:24 PM
   

(स्वप्निल देशमुख)  संग्रामपूर : तालुक्यातील सर्व पत्रकार, बांधवांनी आज दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी तहसील कार्यालय संग्रामपूर येथे तहसीलदार  गायकवाड साहेब यांना व तामगाव पोलीस स्टेशन संग्रामपूर चे उपनिरीक्षक चव्हाण साहेब यांच्यामार्फत गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई. व जिल्हाधिकारी साहेब कार्यालय बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदन मध्ये नमूद आहे की बुलढाणा येथे आंदोलनाचे वृत्त संकलन करण्याकरिता गेलेल्या पत्रकारांना पोलिसांकडून केलेल्या धक्काबुक्की व मारहाणी प्रकरणी तसेच राजापूर येथील पत्रकार शशिकांत वर्षे यांची हत्या करण्यात आली याप्रकरणी संग्रामपूर तालुक्यातील पत्रकार कडून निषेध करण्यात आला असून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी तसेच दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी बुलढाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटने नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाचे वृत्त संकलन करण्याकरिता केलेल्या पत्रकारांना येथील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की व लाठीमार केला असे पोलिसांचे कृत्य हे लोकशाहीचे चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारीतेला अटकाव घालण्याचे असून त्या संबंधित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि राजापूर येथील पत्रकार शशिकांत वर्षे यांनी प्रसिद्ध केलेल्या बातमीचा विरोध म्हणून त्यांच्यावर करण्यात आलेला अपघाती हल्ला करून त्यांची हत्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला या दोन्ही प्रकारचा संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. सदर दोन्ही घटने प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी असे निवेदन संग्रामपूर तालुक्याच्या वतीने इलेक्ट्रिक मीडिया व प्रिंट मीडिया पत्रकाराचे नाव. आणि स्वाक्षरी निवेदनावर लिहिलेले आहेत 
 लोकस्वतंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा अध्यक्ष स्वप्निल देशमुख , जिल्हा सचिव ज्ञानेश्वर दांदळे पाटील तसेच काशिनाथ मानकर दयालसिंग चव्हाण विवेक राऊत शेख मतीन शेख कदीर तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ,  शेख रफिक मनीष लोहिया  नारायण सावकार रामेश्वर गायकी प्रभू पारस्कर आकाश पालीवाल तालुकाध्यक्ष वाईस ऑफ मीडिया, मोहन सोनवणे, राजेंद्र धर्माधिकारी,  संतोष आगलावे, विठ्ठल निंबोळकर महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष, सुनील वामन ढगे, सागर कापसे यांच्यासह सर्व संग्रामपूर तालुक्यातील बहुसंख्या पत्रकार मंडळी उपस्थित होते

    Post Views:  279


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व