भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  20 Apr 2023, 8:43 AM
   

मुंबई -जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळली आहे. यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघातामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. या बसमध्ये 40 ते 45 लोक होते. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती. दरम्यान, अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

Connection failed: Operation not permitted