जगापुढे उभी आहे भिती अणुयुद्धाची गरज आहे मित्रहो जगाला गौंतम बुध्दाची


तेल्हारा येथे रंगले मैत्रीय वाचनालयात कविसंमेलन
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2022-03-14
   

तेल्हारा : जगापुढे उभी आहे 
     भिती अणुयुध्दाची
     गरज आहे मित्रहो 
     जगाला गौतम बुध्दाची 
    प्रसिद्ध कवी शिवराजे जामोदे कविराज यांची रशिया युक्रेन युद्धावर आधारित वरिल कविता तेल्हारा येथिल कविसंमेलनामध्ये लक्षवेधी ठरली. दि.13 मार्च ला मैत्रीय वाचनालयामध्ये झालेल्या या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी पद्मावती तायडे या होत्या. महाराष्ट्र राज्याचे गंथ्र संचालक स्व. गणेश तायडे यांच्या प्रथम जयंती निमित्ताने आयोजीत या कविसंमेलनामध्ये प्रारंभी कु. देशमुख या बहिनिंनी सुस्वरात स्वागत गीत गायन केले .सर्व  उपस्थितांचे  स्वागत पुस्तके देऊन करण्यात आले .या वेळी स्पर्धा परिक्षेत यश मिळविल्या बद्दल  लक्ष्मी सुरेश तायडे व कार्तिक बानेरकर यांचा सत्कार पद्मावती तायडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शिवराजे जामोदे कविराज यांच्या कवितेचे प्रकाशन पद्मावती तायडे व जेष्ठ कवी रामदास खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. 
    वर्‍हाडी कवी गजानन यादगिरे ,गझलकार सतिश दराडे, हास्य कवी विनोद सोनी, रामदास खोडके सर, प्रल्हाद गावत्रे, डाॅ टापरे, सागर पुंडकर, ग्रंथपाल पोहेकर या कवींनी कविसंमेलनामध्ये एका पेक्षा एक दर्जेदार, प्रेरक विविध रसांच्या कविता सादर करेन उपस्थीतांना जिंकले. कविसंमेलनाचे संचालन चारूदत्त मेहरे सर यांनी केले. सतत तीन तास कविसंमेलन चालले. 
  कार्यक्रमाला मोहन तायडे, प्रकाश तायडे,राजेश डांगटे,  मिलिंद तायडे, विवेक तायडे, अर्चना पोहेकर, पाजक्ता गव्हांदे , तसेच स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी उपस्थित होते.

    Post Views:  553


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व