कोकण पत्रकारांच्या आदर आतिथ्याने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ भारावला ! : संजय एम.देशमुख
समुद्रकिनारी पालघर जिल्हा कार्यकारिणीचा दिमाखदार पदग्रहण समारंभ.!
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
2023-05-02
अकोला : लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्याऊ पालघर जिल्हा कार्यकारिणीचा विभागीय पदाधिकारी,जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील हिरवळीवर स्नेहपूर्ण आदरातिथ्यासह घडवून आणलेला नयनरम्य सर्वांगसुंदर पद्रग्रहण समारंभ तथा आढावा बैठकीचा कार्यक्रम कौतुकास्पद आणि अविस्मरणीय आहे. असे प्रतिपादन संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष तथा ईलना राष्ट्रीय पदाधिकारी संजय एम.देशमुख यांनी केले. त्यांनी यावेळी संघटनेची वाटचाल,उध्देश आणि संकल्पना विस्ताराने सांगून पत्रकार हल्ल्यांची प्रकरणे उचलण्यात आणि पत्रकार योजनांमधील त्रूटी निवारण आणि हक्कांच्या मागण्यांमध्ये लोकस्वातंत्र्य महासंघाने घेतलेल्या अग्रेसर भुमिकांची माहिती दिली.
बोईसरमधील नांदगाव येथील समुद्रकिनारी असलेल्या सी वेवज् रिसॉर्ट मधील लॉनवर सायंकाळच्या सुर्यास्तात या कार्यक्रमाचा दिप प्रज्वलनाने शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,गाडगे बाबा व आद्य पत्रकार स्व.बाळशास्त्री जांभेकरांना वंदन करून अभिवादन करण्यात आले.कोकण विभागीय संघटन तथा संपर्कप्रमुख,दै. लोकमतचे पंकजजी राऊत,संपादक विठोबाजी मराठे,गुरूदेव सेवक ज्येष्ठ पत्रकार शामसुंदर आटे,जिल्हा कार्याध्यक्ष संतोष राणे,सचिव संतोष घरत व ईतर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने जिल्हाध्यक्ष जगदिशप्रसाद करोतिया यांनी या सर्वांगसुंदर नियोजनबध्द कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी केन्द्रीय कार्यकारिणीच्या १३ अतिथी पदाधिकाऱ्यांना शाल,मौल्यवान भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन आदरपूर्वक सन्मानित करण्यात आले.रिसॉर्ट मालक महाले यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संजय एम.देशमुख,केन्द्रीय सचिव,ज्येष्ठ पत्रकार राजेन्द्रजी देशमुख,केन्द्रीय मार्गदर्शक व शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे विदर्भ पदाधिकारी पत्रकार पंजाबराव देशमुख ,कोकण प्रमुख पंकज राऊत.जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार जगदिशप्रसाद करोतिया यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.कोकण विभागीय पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार पंकजजी राऊत यांनी संघटनेच्या वाटचालीचा गौरव करून उत्कृष्ट ध्येयधोरणांची तात्विक वाटचाल असणाऱ्या लोकस्वातंत्र्यसोबत आम्ही कोकणवासीय ताकदीने उभे राहू असे अभिवचन यावेळी दिले.जिल्हाध्यक्ष करोतिया यांनीही प्रास्ताविकातून संघटन मजबूत करण्याची ग्वाही दिली.केन्द्रीय सचिव राजेन्द्र देशमुख, मार्गदर्शक पदाधिकारी पुष्पराज गावंडे,विभागीय पदाधिकारी डॉ.शंकरराव सांगळे, किशोर मुटे यांनीही यावेळी मनोगते व्यक्त करून कोकणवासी पत्रकार व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.या दौऱ्यामध्ये विभागीय पदाधिकारी पंकज राऊत यांची नवविवाहीत कन्या सौ.जुईली व जावाई श्रेयश यांची केन्द्रीय पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी कोकण विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख पंकजजी राऊत,विठोबाजी मराठे,शामसुंदर आटे यांचे शाल,ग्रामगीता आणि पुष्पगुच्छ देऊन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व केन्द्रीय पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आले.पालघर संघटनेचे जिल्हा शिल्पकार जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार जगदिशप्रसाद करोतिया यांच्या उत्कृष्ट संघटनकौशल्याचा गौरव करून त्यांना एक खास सन्मानपत्र,नियुक्तीपत्र व शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत कार्याध्यक्ष पत्रकार संतोष राणे,उपाध्यक्ष रियाज मुल्ला,. सचिव संतोष घरत,खजीनदार ज्येष्ठ पत्रकार विजय बोपार्डीकर, संघटक सचिव संपत उजाला, प्रसिद्धी प्रमुख देवेंद्र मेश्राम, कार्यकारिणी सदस्य, सुनील मराठे, साईराज राणे, प्रशांत करोतिया, पत्रकार राजू राउल, साहिद शेख, विकास सिंह यांना नियुक्ती आणि ओळखपत्रे प्रदान करून सर्व विभागीय व जिल्हा पदाधिकारी व सभासदांचे अभिनंदन व त्यांचेसह पत्रकार राजू राऊत,साहिद शेख,विकास सिंह स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला केन्द्रीय कार्यकारिणीकडून पदाधिकाऱ्यांसोबत अकोला जिल्हा सहसचिव सागर लोडम, सतिश देशमुख,बुलढाणा जिल्हाध्यक्ष स्वप्निल देशमुख,लष्कर सेवानिवृत्त सभासद रामराव देशमुख, विजयराव बाहाकर, मनोहर मोहोड,अतुल तायडे,गणेश खोटरे,अमोल साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सेवानिवृत्त प्रो.संजय घरत यांचे उत्कृष्ट शब्दशैलीतील बहारदार संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमास संघटनेचे सभासद बहूसंख्य पत्रकार उपस्थित होते.आभारप्रदर्शन विभागीय पदाधिकारी गुरूदेव सेवक ज्येष्ठ पत्रकार शामसुंदर आटे यांनी केले. पालघर जिल्हा पत्रकार संघाने समुद्रकिनाऱ्यावरील या रिसॉर्टमध्ये केंन्द्रीय पदाधिकाऱ्यांची निवास स्नेहभोजनापासून तर पर्यटनासाठी सोबत फिरण्याचीही सेवा प्रदान करून उत्कृष्ट आणि नियोजनबध्द केलेल्या आयोजनाबध्दल केन्द्रीय पदाधिकाऱ्यांनी बोईसरकर पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना मनोमन शुभेच्छा व्यक्त केल्या.
Post Views: 320