दारूबंदीसाठी महिलांचे आक्रोश आंदोलन


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  10 Mar 2022, 12:42 PM
   

अकोला : विकास पाहिजे; विध्वंस नको म्हणत महिलांनी जागतिक महिलादिनी महिलांनी  आक्रोश आंदोलन केले.          पिंपळगाव(चांभारे) ता. बार्शीटाकळी जि. आकोला येथे दारु मुक्ती आंदोलन करणाऱ्या महिला समितीने सकाळी ग्रामसफाई करुन;गावातून महात्मा जोतिबा फुले पुतळ्यापासून;बाबासाहेब आंबेडकर;तुकडोजी महाराज व गांधी पुतळ्या पर्यत  विविध घोषणा देत मिरवणूक काढली. दारु नको-पिण्याचे पाणी मिळावे याकरीता घागर मोर्चा काढला. दारु नको दूध डेअरी पाहिजे...रोजगार पाहिजे...वाईन विक्री निर्णय रद्द करा;हातल काम द्या;शेतकर्यांना कर्ज मुक्त करा;शेतमाल भाव उत्पादन खर्चावर मिळावेत;दारुत नवरे;मुले मृत्यू झालेल्या कुटुंबाचे पुनर्वसन करा; प्रत्येकी 5 लाख द्या;तरुण विधवांना पुनर्विवाहा करीता 2 लाख मिळावेत; आदि मागण्यांच्या घोषणा मिरवणुकीत दिल्यात. गांधीजी व ज्योतिबा फुले,डाॅ.आंबेडकर पुतळ्यासमोर सरकारचे निषेधार्थ दारु बाटल्या फोडून आपला आक्रोश प्रगट केला. निर्मलाबाई सुरडकर यांचे नेतृत्वात जागतिक महिला दिनी आक्रोश आंदोलन राबविण्यात आले व  परिसरात राबविण्यात येईल. दारु मुक्ती आंदोलन म. रा. चे संयोजक भाई रजनीकांत यांनी मार्गदर्शन केले. दारु व्यसनात पतीचे निधन झालेली विधवा रत्नकला सुरडकर,पंचफुलाबाई अंभोरे,शांताबाई सुरडकर,रुख्मा सुरडकर,लीलाबाई सुरडकर, कैलास सुरडकर,मोहन सुरडकर, सुरेश चांभारे,प्रल्हाद अंभोरे;भिमराव सुरडकर आदींचा सहभाग होता.

    Post Views:  301


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व