कथेच्या नावाने बिगर पावती नंबरच्या साह्याने लाखोची माया जमा


प्रशासनाने कारवाई करण्याचे धाडस दाखवावे !...निर्भय बनो ची मागणी
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  11 May 2023, 5:39 PM
   

अकोला : अकोला येथील म्हैसपुर येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण महाकथेचे आयोजन स्थानिक आयोजकांनी केले असून यासाठी बिगर पावती बुक नंबर व बिगर नंबरच्या पावतीच्या पावत्या फाडून लाखो रुपयाची माया स्थानिक आयोजकांनी जमा केली असून त्यावर कोणत्याही प्रकारची प्रशासनाने कारवाई न करता त्यांना मोकळीक दिलेली आहे. अशा या आयोजकांवर जिल्हा प्रशासनसने कारवाई करण्याची मागणी गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जण आंदोलन यांनी केली आहे. अकोला मध्ये कथा पुरानाच्या नावानं, धार्मिकतेच्या नावाने, देवाधर्माच्या नावाने भोळा भावड्या जनतेची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून जनतेला बिगर पावती बुक नंबर असलेले बिगर नंबरच्या पावत्या देऊन मोठ्या प्रमाणात वर्गणीच्या नावावर व्यापारी व जनते कडून वर्गणी जमा केली जात असून त्याची कोणतेही प्रकारची शासन स्तरावर परवानगी न घेता हे उद्योग आयोजक मंडळी मोठ्या प्रमाणात शहरात करीत आहे. शासनाच्या व प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून दिल्यावरही अद्याप पर्यंत आयोजकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई प्रशासनाने न केल्यामुळे जनतेमध्ये उलट सुलट चर्चला पेव फुटला आहे. त्यांच्या या कृत्याला प्रशासनाची मुक संमती आहे की काय ?अशी जनतेमध्ये चर्चा सुरू आहे. साधी गणपती उत्सव, देवी उत्सवामध्ये वर्गणी जमा कराची असल्यास न्यास नोंदणी कार्यालयामध्ये त्याची नोंदणी करून परवानगी घ्यावी लागते व त्याचा संपूर्ण हिशोब सादर करावा लागतो .परंतु एवढा करोडोची माया जमा करणाऱ्या आयोजकांना मात्र कोणती परवानगी घेण्याची गरज वाटत नाही का? जिल्हा प्रशासनास त्यांना परवानगी घेण्याविषयी सूचना करून पावती पुस्तक क्रमांक व पावती क्रमांक हे बंधनकारक करणे आवश्यक वाटत नाही का? तसेच त्यांनी जमा केलेल्या संपूर्ण पैशाचा हिशोब न्यास नोंदणी कार्यालय, जिल्हा प्रशासन व ज्या जनते जवळून पैसे घेतले त्या जनतेसमोर देणे आयोजकांना बंधनकारक करण्याची मागणी निर्भय बनो जण  आंदोलनाच्या वतीने संयोजक गजानन हरणे यांनी केली आहे. त्याची प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा जिल्हा प्रशासना समोर जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Connection failed: Operation not permitted