दि.५ मे ला श्रीसंत वासुदेव महाराज बाल संस्कार शिबिराचे उद्घाटन


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  04 May 2023, 6:57 PM
   

अकोला : श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या  वतीने बालकांनवर सुसंस्कार होऊन सुदृढ निरोगी व सुसंस्कृत भारताचा नागरिक घडावा म्हणून श्रीसंत वासुदेव महाराज सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन शुक्रवार दिनांक ५/मे 2023 ला सकाळी दहा( १०) वाजता श्रद्धासागर अकोट येथे आयोजित केले असून या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  ह भ प वासुदेवराव महल्ले पाटील अध्यक्ष श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश अहिरे पोलीस निरीक्षक ,  गजानन पूडकर, केशवराव मेतकर  उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था,  सुरेश खोटरे सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था, गजानन हरणे  समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जनआंदोलन,     राजदत्त मानकर ज्येष्ठ समाजसेवक आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे .तरी परिसरातील नागरिक, महिला ,युवक ,युवती भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती विश्वस्त   श्रीसंत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. 

    Post Views:  171


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व