अकोला जिल्हाधिकारीपदी अजित कुंभार रूजू


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  26 Jul 2023, 5:27 PM
   

अकोला  : जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथील जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याकडून स्वीकारला.  त्यांनी आज विविध विभागप्रमुखांची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला.

             श्री. कुंभार हे भारतीय प्रशासकीय सेवेतील सन 2015 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी नांदेड येथे प्रकल्प अधिकारी, बीड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सहआयुक्त म्हणून काम केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी आज विभागप्रमुखांची बैठक घेऊन जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला. बैठकीनंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सर्व कार्यालयांची पाहणी केली. विविध विभागांकडून सुरू असलेली, तसेच नियोजित विकासकामे विहित मुदतीत पूर्ण करावी. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कामे पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

    Post Views:  182


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व