जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरेवाडीत जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  09 Mar 2022, 3:50 PM
   


सरेवाडीत जागतिक महिला दिनानिमित्त गावातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सौ.अलका कोकणे(रहाणे), सौ.उषाताई राजेंद्र फलके (सरपंच नायफड) सौ. अलकाताई निलेश भाईक (ग्रामपंचायत सदस्या)
सौ.सुलाबाई ठोकळ (अंगणवाडी सेविका) सौ. हिराबाई किसन ठोकळ (पोषण आहार स्वयंपाकी) सौ . अनिताताई चंद्रकांत ठोकळ (एकलव्य शिक्षिका) सौ. कुसुमताई काळू ठोकळ(एकलव्य शिक्षिका)
यांचा सत्कार  सरेवाडीचे युवा ॲड. मा.रोहितजी ठोकळ,मा.शरदजी ठोकळ,मा.रोहनजी ठोकळ,मा.श्री.दिलीपशेठ ठोकळ यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना महिला दिनाचे महत्त्व  ॲड.मा. रोहितजी ठोकळ यांनी समजावून सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. उषाताई राजेंद्र फडके यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
आजचा दिवस सावित्रीबाई फुले,रमाबाई रानडे,सिंधुताई सपकाळ,लता मंगेशकर,सरोजिनी नायडू,मा. प्रधानमंञी इंदिरा गांधी,कल्पना चावला,किरण बेदी ,मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील मेधा पाटकर,स्वराज्याच्या कर्त्या-करवित्या आपले प्रेरणास्थान राजमाता आई जिजाऊ*  यांचा...
म्हणूनच या दिवशी नारिशक्तीचा सन्मान करण्याच्या दृष्टीने सर्व वाडीतील आदर्श व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्यात आला. शाळेतील विध्यार्थ्यांच्या  विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मुलांनी महिला दिनानिमित्त भाषणे,घोषवाक्य लेखन स्पर्धा घेण्यात आल्या.
      कार्यक्रमाचे कौतुक अध्यक्ष श्री दत्तात्रय ठोकळ शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ यांनी केले. विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री बापूराव दराडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व व्यवस्थापन श्री.विजयकुमार शेटे, आभार मा. शरदजी ठोकळ यांनी मानले.
*जागतिक महिला दिनाच्या  सर्वाना  शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली*..

    Post Views:  430


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व