महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला वतीने ‘दुधाळ प्राण्यातील चयापचय रोगांसाठी प्रगत निदान तंत्र आणि उपचारात्मक दृष्टीकोन’ या विषयावर व्यावसायिक कार्यक्षमता विकास कार्यक्रमा अंतर्गत एक दिवसीय सतत पशुवैद्यकीय शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे (दि.५) आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्ना.प. प. अकोला संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा डॉ धनंजय दिघे होते. यावेळी महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषद, नागपूरचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर, भारतीय पशुवैद्यक परिषदेचे डॉ . संदीप इंगळे, कुलसचिव, महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषद, नागपूर डॉ. बी. आर. रामटेके, जिल्हा उप आयुक्त पशुसंवर्धन डॉ. तुषार बावने हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
यावेळी, दुधाळ प्राण्यांमधील चयापचय रोग निदान व उपचार पद्धतीत मोठ्या प्रमाणावर नवनविन तंत्रज्ञान विकसित होत आहे ते पशुवैद्यकांनी अवगत करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन डॉ अजय पोहरकर यांनी केले. तर दुधाळ पशुतील चयापचय रोगाचे निदान, उपचार आणि प्रतिबंध करण्याची धोरणे समजून घेण्यासाठी प्रशिक्षणादरम्यान झालेल्या चर्चा नक्कीच उपयुक्त ठरतील असे मत डॉ . संदीप इंगळे यांनी व्यक्त केले.प्रशिक्षण समन्वयक तथा चिकित्सालयीन अधिक्षक प्रा. डॉ. सुनील वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी ‘दुधाळ प्राण्यांमधील चयापचय रोगांसाठी प्रगत निदान तंत्र आणि उपचारात्मक दृष्टीकोन’ या विषयावरील प्रशिक्षण पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
या प्रशिक्षणात अकोला जिल्ह्यातील सहायक आयुक्त पशु संवर्धन, पशुवैद्यकीय अधिकारी, संस्थेतील प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी झाले होते . या प्रशिक्षणात प्रा. डॉ. अनिल भिकाने, प्रा. डॉ. विवेक कासरालीकर, प्रा.डॉ. सुनील वाघमारे,डॉ . किशोर पजई, या व्याख्यात्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षण समारोप प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसमन्वयक डॉ. किशोर पजई तर आभार प्रदर्शन डॉ. रत्नाकर राउलकर यांनी केले. या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी सह समन्वयक म्हणून प्रा . डॉ चैतन्य पावशे, प्रा. डॉ . मिलिंद थोरात, डॉ. महेशकुमार इंगवले आणि डॉ. श्याम देशमुख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ रणजीत इंगोले, डॉ. भूपेश कामडी, डॉ. आनंद रत्नपारखी, पी. डी. पाटील, भास्कर वाघमारे,बी. जी. पाटील आणि गजानन वाघ यांनी सहकार्य केले.