63 व्या महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य स्पर्धे चे थाटात उद्धाटन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  27 Nov 2024, 11:27 AM
   

अकोला -  २५ नोव्हेंबर पासून अकोला येथे मराठी राज्य नाटय स्पर्धेला सुरुवात झाली असून मराठी राज्य स्पर्धेचे उद्घाटन सोमवार दिनांक 25 रोजी स्थानिक प्रमिळताई ओक नाट्यगृहात नुकतेच पार पडले. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळे, मधु जाधव, सुधाकर गीते, रमेश थोरात, दिलीप देशपांडे, अशोक ढेरे उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद विश्वनाथ, विष्णू निंबाडकर, अनिल कुलकर्णी, गीता ताई उनवणे, संजय पुरकर, मालती भोंडे, डॉ. ज्ञानसागर भोकरे, मनीष उनवणे, काजल राउत, ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे अनिल माळवे आदीची विचार पिठावर उपस्थित होती.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालया मार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी अकोला येथील प्रमिला ताई ओक हॉल येथे सुरू झाली  आहे. दिनांक २५ नोव्हेंबर ते  2 डिसेंबर च्या दरम्यान या स्पर्धा होतील. रोज सायं. ७:०० वा नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.  सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे.  
        या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघांचा सहभाग आहे. अकोला शहरासह वाशीम, बुलढाणा चे संघ सुद्धा या स्पर्धेत सहभागी होत आहेत. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे. अकोला केंद्राचे स्पर्धा समन्वयक म्हणून अमोल ताले हे काम पाहत असून सहसमन्वयक महेश बगडिया आहेत. सलग आठ दिवस 63 व्या हौशी नाट्य स्पर्धेचे काम पाहणार असून जास्तीत जास्त नाट्य रसिकांनी नाटकांचा आस्वाद घ्यावा असे आव्हान उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी बोलताना व्यक्त केले.

    Post Views:  45


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व