महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रविंद्र भोळे ह्यांना फेस ऑफ इंडिया 2022चा अवार्ड प्रदान


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  04 Mar 2022, 12:39 PM
   

पुणे : राज , रचना, कला एवं साहित्य परिषद रायपूर च्या वतीने फेस ऑफ़ इंडिया 2022 पुरस्कार प्रदान करण्यात आले.त्यामध्ये भारताचे  प्रधानमंत्री माननीय नरेंद्र भाई मोदिजी यांचेसह नऊ केंद्रीय मंत्री,,भारतातील माननीय दहा मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय ,कार्य करणार्‍या समर्पित कार्यकर्त्याना फेस ऑफ़ इंडिया अवार्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या कार्यकमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, अध्यात्मिक, अपंग तसेच वैद्यकीय क्षेत्रांतील जेष्ठ समाजसेवक, प्रवचनकार ह.भ.प. डॉ रविंद्र दिनकर भोळे यांना सुध्दा  हा फेस ऑफ़ इंडिया ’अवार्ड प्रदान करण्यात आला. डॉ रविंद्र  डॉ.भोळे यांनी विविध क्षेत्रात समर्पित तसेच निष्काम कर्मयोगी वृत्तीने नेत्रदिपक कार्ये केलेली असून विविध क्षेत्रातील अतुलनीय कार्याबध्दल नामवंत मान्यवरांसोबतच  त्यांनाही हा बहूमान प्राप्त झाला आहे. त्यांना यापूर्वीही रोमन मगसेस पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्याचप्रमाणे  पद्मश्री स्व.डॉ मणीभाई देसाई यांनी 1991 मध्ये त्यांचा विशेष सन्मान्पत्र देउन गौरव केलेलाआहे. डॉ. रविंद्र भोळे हे राज्यातील निष्काम  कर्मयोगाने वाटचाल करणारे एक सेवाभावी सेवाव्रती आहेत.  म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल घेऊन पारधी समाजातील लेखक भास्कर भोसले ह्यानी वाळवंटातील सामाजिक सरोवर- डॉ रविंद्र भोळे ’हे चरित्रात्मक पुस्तक लिहिले त्यांचेवर लिहलेले आहे. ह्या पुस्तकाचे प्रकाशन शिवशाहीर  स्व. बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे शुभ हस्ते पुणे येथे झाले होते. मराठवाडा भुकंपात कार्य केल्यामुळे स्व.बाळासाहेब देवरस सरसंचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनीसुध्दा त्यांच्या कार्याबध्दल  गौरवोद्गार काढले होते. अनेक ऋषितुल्य विभूती समवेत समर्पित भावनेने डॉ. रविंद्र भोळे ह्यानी कार्य केलेले आहे.

    Post Views:  420


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व