सत्यशोधक मंचाचे नेत्रतपासणी शिबीर संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  29 Jan 2026, 9:09 AM
   

112 रुग्णांची तपासणी तर 44 रुग्णांना मोफत चष्मेवाटप
सावित्रीबाई फुले जयंती( 3 जानेवारी) व राजमाता जिजामाता जयंती (12 जानेवारी) निमित्य /औचित्य साधून सत्यशोधक मंच मोठी उमरी अकोला व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्था मोठी उमरी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि. १०.०१.२०२६ रोजीच्या नेत्रतपासणी शिबिरात ११२ रुग्ण तपासणी व दि. २०.०१.२६ रोजी ४४ रुग्णांना मोफत चष्मेवाटप करण्यात आले. नेत्रतज्ञ डाॅ. निलेश वानखडे यांनी रुग्णतपासणी केली. प्रसंगी डाॅ. राजेश तायडे, डाॅ समता लोखंडे, डाॅ हेमंत नाथे, डाॅ. मयुर धनोकार व डाॅ अनील मारोतकर हे उपस्थित  होते.
सत्यशोधक मंचाचे वतीने २०२६ या वर्षात दरमहा विविध विशेषज्ञ डाॅक्टरांव्दारे रुग्णतपासणी च्या १२ शिबिरांचे आयोजन करण्यात येईल तसेच  शिवजयंती (१९ फेब्रु) व गाडगे महाराज जयंती (२३ फेब्रु) निमित्य दि.२२ फेब्रुवारी रोजी त्वचारोग तपासणी  शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती सत्यशोधक मंचाचे अध्यक्ष गजानन धामणकर यांनी दिली.
 क्रांतीसुर्य पतसंस्थेमध्ये आयोजित या शिबिराचे उद्घाटन  श्री. श्रीधर अकर्ते व सौ.उषाताई  अकर्ते या पाणीपुरी व्यावसाय कलणार्‍या दांपत्याच्या हातून करण्यात आले. प्रामाणिकपणे पाणीपुरीचा व्यवसाय करून दोन्ही मुलींना शिकवुन, दोन्ही मुले शासकीय नोकरी मध्ये असणार्‍या या मेहनती दांपत्यांच्या हातुन या शिबिराचे उद्घाटन करुन समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला.
यावेळी पतसंस्थेच्या अध्यक्षा शारदा धनोकार, उपाध्यक्षा राजश्री महाजन, सौ. कुंदाताई लोखंडे, श्री मुरलीधर हुशे, राहुल देशमुख, हरीश नावकार, भिकाजी वाढोकार, संदीप भुस्कट,  श्री गोपाळर धनोकार, महेश शेगोकार, आयुर्वेद नाडीतज्ञ डाॅ. समता लोखंडे, योगतज्ञ अरुण धनोकार, समता परीषदेच्या सौ मायाताई इरतकर, श्री रामभाऊ धनोकार, साहेबराव मसने, गजानन जवुळकार, गणेश देशमुख, वंदे मातरम संघटनेचे उमेश मसने, संजय पळसपगार आदी मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी गापत्री परीवाराच्या उषाताई देवघरे, कवयित्री सौ माधुरी धनोकार व रोटरी क्लब अकोटचे संदीप भुस्कट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माणसांमध्ये देव शोधत मागील बारा वर्षापासून सत्यशोधक मंच कार्यरत आहे.यामध्ये अनेक स्वच्छता मोहीम वृक्षारोपण, सीड्स बॉल कार्यशाळा, रोगनिदान महाशिबिर, नेत्र तपासणी शिबिर, त्वचारोग, हृदयरोग, पोटदुखी, दंतरोग, स्त्रीरोग , अस्थिरोग शिबिर, रक्तदान शिबिर, जलसाक्षरता शिबिर, उद्योजकता शिबिर, बालसंस्कार शिबिर , महापुरुषांच्या जयंती - पुण्यतिथी या निमित्ताने महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्याकरता अनेक उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात येतात.
 कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भिकाजी लोखंडे, निलेश म्हैसणे,  अजय जांभळे, सौ पुष्पा वाढोकार, सौ वर्षा जढाळ, श्रीमती रत्न हुशे, सौ पद्मा बहाड, सौ तेजस्विनी चिंचोलकर, सौ सुलभा आसोलकार, सौ ज्योती आसोलकार , सौ बबीता फुंडकर ,सौ.सविता आखतकर, सौ शितल हाडोळे, सौ.नेहा लोखंडे, सौ. रश्मी मसने यांनी प्रयत्न केले.

    Post Views:  8


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व