साताराची बहीण बारामतीच्या भावासाठी आली धावून; स्वतःचे यकृत देत भावाला दिले जीवदान


 संजय देशमुख  03 Feb 2022, 1:53 PM
   

सोमेश्वरनगर (पुणे) : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील भादे ग्रामपंचायत सदस्य असलेल्या बहिणीने बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील पोलीस असलेल्या भावाला स्वतःचे यकृत देत दिले जीवदान दिले आहे. वाघळवाडी येथील एका महिलेने स्वतःचा जीव धोक्यात घालून भावाला यकृत दान केले आणि भावाचा जीव वाचवला. वाघळवाडी येथील आप्पासाहेब  नावडकर यांच्या कुटुंबातील मोठी मुलगी मालन बापूसाहेब चव्हाण (रा.भादे ता. खंडाळा, जि. सातारा) हिने तिचा भाऊ रुपेश आप्पासाहेब नावडकर (रा. वाघळवाडी, ता.बारामती. जि.पुणे) याला यकृत दान करून यांचे प्राण वाचवले.

रुपेश हे पोलीस कर्मचारी आहेत. त्यांचे यकृत खराब झाले होते. त्यांना तातडीने यकृताची गरज होती. पण कुठेच यकृत मिळाले नाही. तेव्हा त्यांच्या धाडसी बहिणीने स्वतः चे यकृत त्यांना देऊन भावाचे प्राण वाचवले. मालन चव्हाण या भादे या गावी ग्रामपंचायत सदस्या आहेत. २ फेब्रुवारी रोजी पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमधे त्यांचे ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले. इतर सर्व भगिनींपुढे या महिलेने एक आदर्श ठेवला आहे.

    Post Views:  249


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व