डॉक्टर बाबासाहेबांचे जीवन सर्वांसाठी पथदर्शक युवकांनी त्यांचा आदर्श घ्यावा - विजयभाऊ अग्रवाल


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  14 Apr 2022, 6:32 PM
   

भाजपा पूर्व मंडळाच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भगवान महावीर यांची जयंती व अकोला पूर्व चे लोकप्रिय आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम साजरे.... माजी केंद्रीय मंत्री नामदार श्री संजय भाऊ धोत्रे आमदार श्री गोवर्धन जी शर्मा आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर आमदार श्री वसंत जी खंडेलवाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व महानगराध्यक्ष श्री विजय भाऊ अग्रवाल युवा नेते अनुप धोत्रे महापौर सौ अर्चना ताई मसने महानगराचे सरचिटणीस डॉक्टर विनोद बोर्डे संजय जिरापुरे संजय गोट फोडे संजय गोडा अक्षय गंगाखेडकर जयंतराव मसने, उकंडराव सोनोने,पूर्व मंडळ अध्यक्ष एडवोकेट देवाशीष काकड,धनंजय धबाले, दक्षिण मंडळ अध्यक्ष गणेश अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व महावीर जयंतीनिमित्त आणि अकोला पूर्व चे लोकप्रिय आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त गायत्री बालिकाश्रम येथे फळ व ग्लुकोजचे पाकिटांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महानगराचे अध्यक्ष श्री विजय अग्रवाल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व भगवान महावीर यांच्या आदर्श जीवनाचे कथन केले तसेच सर्व कार्यकर्त्यांना या महानुभावांचे अनुकरण करण्याचा आग्रह केला व अकोला पूर्व चे लोकप्रिय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विकासकार्याला शुभेच्छा दिल्या.
युवा नेते श्री अनुप भाऊ धोत्रे यांनी सर्व युवकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा आग्रह केला व आजच्या युवा पिढीने व्यसनाच्या अधीन न जाता लोक कार्यात व समाजाभिमुख कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन देशाचा विकास करण्याचे आवाहन केले तसेच आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व पदाधिकाऱ्यांनी सामाजिक लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी महिला आघाडी अध्यक्ष चंदाताई शर्मा , सुमन ताई गावंडे,  जानवी ताई डोंगरे, वर्षा गावंडे, साधना येवले, कायंदे ताई निशाताई कडी सागरभाऊ, शेगोकार, विनोद जी मापारी, धनंजय धबाले, डॉक्टर अमोल केळकर, मोहन पारधी, निलेश काकड, पूर्व मंडळ सरचिटणीस संदीप गावंडे ,आकाश ठाकरे, अभिजीत कडू ,केशव हेडा, शिवम ठाकूर ,गोपाल जी मुळे, दिलीप भरणे ,एडवोकेट नितीन गवळी, राजीव थोरवे, उमेश श्रीवास्तव, सतिश येवले, संतोष डोंगरे, निलेश ढेवा, मनीष बुंदेले, श्रीकांत गावंडे, रितेश जामनारे, मयुर शर्मा ,राज पलन ,यश अग्रवाल ,शुभम चंदन, प्रवीण पोटे, सचिन देशमुख, मंगेश झीने, योगेश फुसे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्व मंडळ अध्यक्ष एडवोकेट देवाशीष काकड यांनी केले व आभार प्रदर्शन पूर्व मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष केशव हेडा यांनी केले.

    Post Views:  175


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व