नाशिक( प्रतिनिधी ) येथील महात्मा गांधी रोडवर यशवंत व्यायाम शाळेच्या कंपाउंडवर साप्ताहिक कुसुमाग्रज नगरचे संपादक रामदास नागवंशी यांनी आपल्या संकल्पनेतून साकार केलेल्या कुसुमाग्रज नगर पत्रकार कट्ट्याचे उद्घाटन निवृत्त सनदी अधिकारी बी.जी.वाघ यांच्या हस्ते उत्साहात झाले. गौरी आगमनाच्या शुभ दिनी झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमास दिव्यांगांचे आधारस्तंभ,जेष्ठ पत्रकार,जेष्ठ समाजसेवक व थोर वक्ते डॉ.मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, जेष्ठ साहित्यिक प्राचार्य प्र.द.कुलकर्णी,ज्येष्ठ विधितज्ञ प्रा.व साहित्यिक ॲड.मिलिंद चिंधडे, दैनिक देशदूतचे जेष्ठ पत्रकार नरेंद्र जोशी, साप्ताहिक कुसुमाग्रज नगरचे कार्यकारी संपादक पद्माकर देशपांडे,पत्रलेखन संघटनेचे अध्यक्ष प्रा.रमेश कडलग,माजी जिल्हा माहिती अधिकारी विजय पवार,दैनिक भ्रमरचे हेमंत आंबेकर, चंद्रकांत वाघुलीकर, किरण माळी, लेडीज टेलर सुनील बापुराव, जाधव,दत्तात्रय पंडित सोनवणी,पेपर विक्रते व कवी दत्तू दाणी,जिल्हा फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप,फोटोग्राफर प्रताप पाटील, नॅबचे संचालक शशांक हिरे,सामाजिक कार्यकर्ती सौ.ज्योती प्रकाश घुगे,यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील सरांनी आठवणीने फोनद्वारे अभिनंदन करून शुभेच्छा दिला.आदींसह पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील विवध क्षेत्रातील तसेच विशेष उपस्थितीमध्ये न्युझीलंड येथील क्रुझवर कार्यरत असलेले पदाधिकारी सुधीर (बापू) मालपाठक,दैनिक आपलं महागरचे पत्रकार राजेंद्र धांड व एम.जी. रोडवरील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, व्यापारी मित्र परिवार उपस्थित होते.
चालू घडामोडींच्या संबंधात मंथन करण्यासाठी कुसुमाग्रजांच्या नावाने स्थापन झालेल्या या पत्रकार कट्ट्याचा उपयोग होऊ शकतो. त्या दृष्टीने पत्रकारांच्या हितासाठी नियमित भेटीगाठी व कार्यक्रम व्हावेत अशी अपेक्षा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बी.जी.वाघ, रमेश कडलग,प्रा.प्र.द. कुलकर्णी, डॉ.मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, पद्माकर देशपांडे आदी मान्यवर उपस्थितांनी मनोगते व्यक्त केली. या कुसुमाग्रज नगर पत्रकार कट्ट्याचे निमंत्रक संपादक रामदास नागवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Post Views: 22