सरेवाडीत व्यवसायाभिमुख प्रत्यक्ष शिक्षण


 संजय देशमुख  18 Feb 2022, 12:23 PM
   

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरेवाडी(नायफड)... राजगुरुनगर(खेड) शहरापासून पन्नास किलोमीटर दूर, भीमाशंकरच्या पायथ्याशी,शंभर टक्के आदिवासी क्षेत्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा....नेहमीच्या शिक्षणाबरोबरच चार भिंतीच्या बाहेर जाऊन, निसर्गातील प्रत्यक्ष अनुभवावर भर देऊन,अध्ययन अनुभव देणारी शाळा.
        आजही असाच एक उपक्रम या शाळेत राबविण्यात आला. वीटभट्टी कारखान्यास भेट. खरंतर हल्ली घरे बांधण्यासाठी पक्क्या वीटांचा वापर केला जातो. पण या सरेवाडीत एवढ्या दूर अंतरावरून वीट वहातूक करणे प्राकृतिक दृष्टीने अतिशय अवघड...
     त्यामुळे यावर उपाय म्हणून   येथील शेतकरी श्री.दत्तात्रय ज्ञानदेव ठोकळ यांनी स्वतःचे घर बांधण्यासाठी, स्वकष्टातून स्वताःकरीता हा वीट भट्टीचा कारखाना सुरू केला आहे. जि प शाळेचे मुख्याध्यापक श्री.बापूराव दराडे यांनी त्यांच्या शी संपर्क साधून कारखान्यास प्रत्यक्ष भेटीचे आयोजन केले. उपशिक्षक श्री विजयकुमार शेटे यांनी सर्व २२ विद्यार्थ्यांना घेऊन  स्वतःच्या हाताने माती, चिखल कालवून विद्यार्थ्यांना वीट बनविण्याच्या कामाबाबतची माहिती सांगून प्रत्यक्ष वीट बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले व विद्यार्थ्यांकडून करून घेतले. शिक्षकांनी या व्यवसायाचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून पटवून दिले.भविष्यात बेरोजगारी कशी दूर करता येईल याचेही मार्गदर्शन यातून विद्यार्थ्यांना झाले. छोट्या प्रमाणात आपण आपला व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून आपण परिस्थिती वर काही प्रमाणात मात करू शकतो हेही यातून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात आला..
     याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष श्री.दत्तात्रय ठोकळ, श्री.किसन मारुती ठोकळ ,श्री. भाऊ मारुती ठोकळ,श्री.पांडुरंग ज्ञानदेव ठोकळ, श्री.प्रवीण बाळू जोशी, श्री.मिनदास जोशी, मुख्याध्यापक श्री.बापूराव दराडे ग.मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची व्यवस्था श्री.विजयकुमार शेटे  सर यांनी पाहिली.
         खेड तालुक्याचे उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी श्री.संजयजी  नाईकडे, डेहणे बीटचे विस्ताराधिकारी श्री.जीवनजी कोकणे, नायफड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. भरतजी लोखंडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

    Post Views:  353


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व