नवाब मालिकांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे धरणे आंदोलन
सूडबुद्धीने ईडीची कारवाईचा आरोप; विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
अकोला: महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर सूडबुद्धीने ईडीने कारवाई करून त्यांना बळजबरीने अटक केली. केंद्रातील सरकार सातत्याने ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम करीत असल्याने महाविकास आघाडीतर्फे अशोक वाटिका येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यात धरणे आंदोलन करण्यात येत असून स्थानिक अशोक वाटिका जवळ जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले. या धरणे आंदोलनात शिवसेनेचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. नितीन देशमुख, जिल्हा काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष अशोक अमानकर, शहर अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक रफिक सिद्दीकी, नगरसेवक फय्याज, शिवसेनेचे गटनेते प्रकाश तायडे, गोपाल दातकर, राजेश भारती, महेश गणगणे, निखिलेश दिवेकर, कपिल रावदेव, प्रशांत गावंडे, भूषण गायकवाड, सुरेश ढाकोलकर, अंशुमन देशमुख, अजय मते, शंकरराव लंगोटे, सागर कावरे, राहुल थोटांगे, अंकूश तायडे, जगदिश मुरुमकार, नागसेन शिरसाट, तश्वर पटेल, महेंद्र गवई, सै. बुर्हान, रोहन धाबेकर, राजेश मते, अतुल अमानकर यांच्यासह बहुसंख्याने महाविकास आघाडीचे नेते, जिल्हापदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 307