दिग्रसच्या सुपीनाथ मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न
अकोला : पातुर तालूक्यातील कातील श्री. सुपीनाथ संस्थान दिग्रस बु. येथे माघ शुद्ध दशमी शुक्रवार रोजी पुजनिय अक्षानंद महाराज अंबासी,ह.भ प. जेष्ठ किर्तनकार मार्गदर्शक गोपाळराव महाराज त्याच प्रमाणे भागवतकार ह.भ.प.रामकृष्ण महाराज वअ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भानुदास कराळेयांचे प्रमुख उपस्थितीत प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी पुण्यतिथी सेवा समितीचे अध्यक्ष बलदेवराव पाटील,अकोला शहर अध्यक्ष काशिराम लोखडे, मध्यवर्ती चे ज्ञानदेवरावजी भाकरे संस्थानचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमुर्ती गाडगे महाराज , छत्रपती शिवाजी महाराज ,माऊली ज्ञानेश्वर महाराज,व संत तुकाराम महाराज गोमाता माता मुर्ती यांना हारार्पण करून पूजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून श्री . भानुदास कराळे यांनी मुर्तीला हारार्पण आणि पूजनामागील उध्देश विषद केला. अक्षानंद महाराज ,रामकुष्ण महाराज गोपाळ महाराज यांनी कोणत्याही कार्यास आध्यात्माची जोड असल्याशिवाय ते कार्य पूर्ण होत नाही,आणि त्यासाठी सेवाभावी मानसाची गरज असते. ती सेवा सुपिनाथ भगवान गुलाबराव पाटील यांचेकडून करून घेत आहेत असे यावेळी सांगीतले.बलदेवराव पाटील यांनी राष्ट्रसतांची अनेक प्रमाणे देऊन देऊन गुलाबराव पाटील यांचकडून अशीच सेवा घडावी अशी प्रार्थना या प्रसंगी केली. संस्थानच्या सर्व सदस्यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. तालूका सेवाधिकारी गजानन आलट यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवलालजी पाटील, दत्ता पाटील नागोरावजी अनंत पाटील, धनराज पाटील, रामा ताले यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाला पंचकोशीतील भरपूर नागरीक उपस्थिती होते. शेवटी जयघोष घेऊन महाप्रसादाने सांगता झाली.
Post Views: 203