विश्वप्रभात आणि प्रसार माध्यमांच्या रेट्यामुळे अन्न व औषध प्रशासन झाले जागे


संजय देशमुख यांना विनाकारण बदनाम करणारे शेवटी पडले उघडे
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  19 Oct 2023, 7:49 PM
   

अकोला शहरातील चार औषध दुकानांचे एक महिन्यासाठी निलंबन आणि न्यायालयीन कार्यवाही
अकोला  : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करुन बिना परवाना जागेत अवैध साठे बाळगणे, मुदत संपलेल्या औषधांचा दुरुपयोग करणे, गर्भपाताच्या कीट, झोपेच्या गोळ्या आणि कोडीन सायरप अशा अनेक औषधांचा डॉक्टरांना पुरवठा करून रुग्ण आणि समाज जीवन तथा स्वास्थाला धोका पोहचविणारे उद्योग करणार्‍या औषधी विक्रेत्यांवर अखेर अन्न व औषध प्रशासनाने एकदाचा कार्यवाहीचा बडगा उगारला. याबाबत सामाजिक कार्यकर्ते श्री संजय कृष्णराव देशमुख यांचे तक्रारीवरून या विभागाने तपासणीअंती कार्यवाही करुन अकोला शहरातील वोरा एजन्सी द अशोक फार्मा, भरतीया एजन्सी, श्री डिस्ट्रीब्युटर्स यांचेकडून एकूण रू. 2,35,077 चा माल मुक्त करून पंचनाम्याअंती जप्त केला. चारही प्रतिष्ठानांवर 30 दिवसांची निलंबनाची कार्यवाही करुन त्यांचेविरुद्ध न्यायालयीन कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. 
सामाजिक कार्यकर्ते संजय कृष्णराव देशमुख यांनी नियमांचे उल्लंघन करुन औषधांचे काळेबाजार करणार्‍या औषध विक्रेत्यांविरुद्ध कारवाईची मागणी दि. 2 जून 2023 रोजी केली होती. त्याच काळात औषध विक्रेत्यांच्या संघटनेची निवडणुक होती. त्यामुळे पित्त खवळून संघटनेच्या एका पदाधिकार्‍याने त्यांचे विरुद्ध प्रसारमाध्यमातून खंडणीचे खोटे आरोप करुन जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारही केली होती. उलटा चोर कोतवाल को डाटे या खोट्या मनावृत्तीने देशमुख यांना बदनाम करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. यामध्ये प्रसारमाध्यमांच्या एक-दोन प्रतिनिधींनी त्यांना तोतया पत्रकार संबोधन पत्रकारीतेलाही बदनाम करण्याचे प्रयत्नही केले होते. अशा व्यापार्‍या विरुद्धच्या तक्रारीचा देशमुख यांनी पाठपुरावा न सोडल्यामुळे शेवटी दुध का दुध और पानी का पानी या न्यायाने झालेल्या कारवाईने अशा औषधी विक्रेत्यांचे समाजाला फसवित राहण्याचे अप्रामाणिक मनसुबे उघड झाले आहेत. औषधी विक्रेत्यांच्या अशा अनैतिक आणि भ्रष्ट मनोवृत्तीविरुद्ध समाजानेही जागे होऊन वेळोवेळी समोर आले पाहिजे, असे आवाहन अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.

    Post Views:  188


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व