अपहरण आणि पिडीता तपासातून पोलिसांकडून १०६ गुन्हे उघडकीस


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  09 Nov 2023, 5:59 PM
   

अकोला - अकोला पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून महिला व बाल अत्याचारासंदर्भात कलम ३६३ व ३६६(अ ) व महिला मिसिंग प्रकरणातून आतापर्यंत ७३ आणि हरविल्याची ३३ असे १०६ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
      अकोट शहर पोलिस स्टेशन अंतर्गत कलम १०२/२०२२ व ३६३ च्या गुन्ह्यातील आरोपी हे जळगांव खान्देश वरून येऊन बाळापूरहून वर्धा जाणार असल्याच्या मिळालेल्या खात्रीलायक बातमीवरून तपास करण्यात आला होता.त्यातील मुला मुलीला बाळापूर बस स्टॅंडवरून ताब्यात घेण्यात येऊन आकोट पोलिसांच्या ताब्यात देण्यातत आले‌.
सदर कार्यवाही अकोला जिल्हा पोलिस अधिक्षक श्री संदिप घुगे,अप्पर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे,उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय खर्चे,पो.हे कॉ.सुरज मंगरूळकर, धनराज चव्हाण, मपोकॉ.पूनम बचे,वाहन चालक पो.कॉ अविन्द्र खोडे यांनी पार पाडली.ईतर गुन्ह्यातही कसून तपास सुरू आहे.

    Post Views:  112


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व