हिजाब वादात प्रकाश आंबेडकरांची उडी! कायदा आणि संविधानाचा दाखला देत काय म्हणाले?


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  21 Feb 2022, 12:58 PM
   

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून हिजाबवरून (Hijab Controversy) देशात मोठा गदारोळ सुरू आहे. कर्नाटकात (Karnataka Hijab dispute) सुरू झालेले या वादाचे लोन सध्या देशभर पसरले आहे. कर्नाटक सरकारच्या आदेशाला आव्हान देत मुस्लिम विद्यार्थिनींनी (Muslim Girl) उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यावर कोर्टातही सुनावणी सुरू आहेत.कर्नाटक सरकारने आदेश दिले आहेत की विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांनी ठरवून दिलेला गणवेश परिधान करावा. यावरूनच हा वाद पेटला आहे. हिजाब घालून घोषणाबाजी करणारी मुस्कानही देशातल्या घराघरात पोहोचली आहे, महाराष्ट्रातही यावरून राज्यभर आंदोलनं झाली. याच वादात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी हिजाबच्या समर्थनार्थ कोर्टाला विनंती केली आहे.एवढेच नाही तर त्यांनी संविधान आणि कायद्याचाही दाखला दिला आहे.

हिजाब वादावरून कोर्टाला विनंती करत आंबेडकर म्हणतात, आम्ही न्यायालयाला विनंती करतो की, ड्रेस कोडबाबत घटनेत किंवा कायद्यात कोणतीही तरतूद नाही यावर त्वरित निर्णय घ्यावा. लोकांना हवे ते परिधान करण्याचा मूलभूत अधिकार आहे. सरकारने याची अंमलबजावणी करावी. हा निर्णय आला तर समाजात शांतता नांदेल, शांतता नांदेल, असे मला वाटते, आशा आशयाचे ट्विट आंबेडकरांनी केले आहे. या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक पोशाखावर कर्नाटक उच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. तसंच सर्व शिक्षण संस्था सुरु करा असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

हिजाब वादावर महाराष्ट्रातही आंदोलनं

मागे मालेगावात हिजाबसाठी हजारो मुस्लिम महिला एकवटल्याचे पहायला मिळाले. पोलिसांचा विरोध झुगारून कल्लू स्टेडियम वर हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती दिसून आली. हे आंदोलन करताना या महिलांच्या हातातील फलकांनीही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण हे फलक उर्दूत होते. अहमदनगरला हिजाब प्रकरणी राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आल्याचेही दिसून आले. तर दुसरीकडे नगरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत हिजाबला विरोध करणाऱ्यांचा निषेध केला होता. या वादावर देशभरातील नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे आता आंबेडकरांनी थेट कायद्याचा आणि संविधानाचा हवाला दिल्याने या प्रकरणात नवं ट्विस्ट येणार का? हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

    Post Views:  332


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व