अखेर लाखनवाडा येथील शेतकऱ्याला शेत रस्त्यासाठी न्याय मिळाला


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  05 Jul 2025, 8:40 AM
   

अकोला : अकोला तालुक्यातील लाखनवाडा येथील  गट क्रमांक 13 मधील बी एन डी / 54 या केसमधील शेतकऱ्याला गेला वीस ते पंचवीस वर्षापासून शेतात जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार संबंधिताकडे केली होती त्यानुसार प्रशासनाने 9/ 12/ 2024 रोजी दिलेल्या आदेशानुसार रस्ता मोकळा करण्याचे आदेश जारी केले होते या आदेशानुसार अकोला येथील निवासी नायब तहसीलदार चिमणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित जागेची पाहणी करण्यात आली अर्जदार व गैर अर्जदारांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते अर्जदार ठरलेल्या वेळी हजर होते. अर्जदाराकडून त्यांचे वकीलही हजर होते. मात्र गैर अर्जदार अनुपस्थित राहिले संपर्कासाठी त्यांना प्रयत्न करण्यात आले परंतु ते उपलब्ध झाले नाहीत पाहणी दरम्यान रस्त्यावर काटेरी कुंपण खांब नाली किंवा अन्य कोणतेही अतिक्रमण आढळून आलेले नाही त्यामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार ट्रॅक्टर द्वारे कॅनॉल जोडून पश्चिम पूर्व व आणि उत्तर दक्षिण धुर्यावरून रस्ता मोकळा करून शेतकऱ्याला अखेर न्याय देण्यात आला. अर्जदाराकडून रस्ता मोकळा करून देण्यासाठी अँड  कावेरी मनोहर खाडे यांनी काम पाहिले.

    Post Views:  36


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व