संवेदना फाऊंडेशनची कुष्ठरोगी बांधवांसोबत दीपावली साजरी
रायगड - संवेदना फाऊंडेशन संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत मागील १८ वर्षाची परंपरा जपत या वर्षीही दीपावली सण शांतीवन, नेरे, पनवेल येथील कुष्ठरोगी बांधवांसोबत साजरा केला.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आता थांबायचं नाय हा मराठी चित्रपट ज्यांच्या निर्भीड कार्यावर आधारित आहे, असे मुंबई मनपाचे माजी सहायक आयुक्त उदयकुमार शिरूरकर, ॲड संतोष भालेकर, समाजसेवक प्रदीपभाई जाधव, प्रवीण लाड, संतोष बामणे, योगेश पवार, कवी लेखक नरेंद्र पवार, शासकीय अधिकारी अमित लाळगे आदी मान्यवरांनी संवेदना फाऊंडेशन संस्थेमार्फत, विविध दुर्बळ घटकांसाठी केलेले काम, जपलेली सामाजिक बांधिलकी व राबविलेले उपक्रम याचे कौतुक केले व कुष्ठरोगी बांधवांप्रती संवेदना व्यक्त केल्या. यावेळी रंगदेवता या नाट्य संस्थेच्या बॅनरचे अनावरण करण्यात आले. या नाट्यसंस्थेचे अध्यक्ष शैलेश फणसगावकर यांनी ही मनोगत व्यक्त केले.
सदर सोहळ्यात प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री उदयकुमार शिरूरकर मा सहाय्यक आयुक्त मुंबई मनपा, नार्कोटेक्स वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष भालेकर, ज्येष्ठ समाजसेवक श्री प्रदीप जाधव, मराठा मंदिरचे सरचिटणीस श्री योगेश पवार,शिवसेना लोकाधिकार समितीचे सचिव श्री संतोष बामणे शौर्य फाउंडेशनचे अध्यक्ष श्री प्रवीणजी लाड, उद्योजक/आयटतज्ञ श्री. प्रशांत परब, विक्रीकर अधिकारी श्री अमित लाळगे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगचे अधिकारी श्री महेंद्र माने, नाट्यदिग्दर्शक शैलेश फणसगावकर, रुग्णमित्र संस्थेचे श्री विनोद साडविलकर म्हाडाचे सहाय्यक अभियंता श्री भागवत शिंदे, कवी लेखक श्री.महेंद्र पवार,शासकीय अधिकारी अमोल लुळे, उद्योजक श्री. दीपक गायकवाड, समाजसेवक श्री विशाल मालुसरे, समाजसेवक श्री सुहास मोरे,संगीतकार श्री.संकेत शिर्के,समाजसेवक श्री.मंगेश चव्हाण,
मनपा शिक्षिका सौ.तनवी बनसोडे संस्थेचे सरचिटणीस विकास चाळके खजिनदारश्री चाळके संस्थेचे अध्यक्ष श्री विनोद सदानंद चाळके संस्थेचे पदाधिकारी,श्री.प्रभाकर महाडीक,श्री दीपक गुप्ता,सौ.दीप्ती गुप्ता,श्री. सुधाकर महाडिक,श्री.रंजित म्हामुळकर,श्री निखिल पुष्करणा,कु.अथर्व बामणे,कु. विपुल चव्हाण,श्री. कमलेश कुबल,कु. ओमकार चाळके,कु. तन्मय चाळके कु.प्रशांत (बंटी )जाधव कुमारी वेदांती चाळके शांतीवनचे सरचिटणीस ॲड. ठाकूर, श्री.नीलकंठ कोळी, श्री.संतोष ढोरे व कुष्ठरोग निवारण समिती परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते,सदर कार्यक्रमासाठी योगदान दिलेल्या सर्व हितचिंतकाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी कुष्ठरोगी बांधवांसाठी स्नेहभोजन, फराळ वाटप, महिलांसाठी साडी वाटप आणि विद्यार्थ्यांना नोटबंक वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी, लेखक महेंद्र माने यांनी खुमासदार शैलीत केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष विनोद चाळके यांनी केले.
Post Views: 147