माझे मरणे अटळ, कविता मरणे नाही- कवी अनंत राऊत
अकोल्यात बहारदार कवी संमेलनाला उदंड प्रतिसाद
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
27 Aug 2024, 11:53 AM
अकोल्यात गेल्या रविवारी मित्र बनवा मध्ये गारळासारखा फेम कवी अनंत राऊत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात आधार कवी संमेलन रंगले तब्बल चार तास चाललेल्या या कवी संमेलनात तुडुंब भरलेल्या हॉलमध्ये रसिकांनी महाराष्ट्र गावातील नामवंत कवींना जोरदार प्रतिसाद दिला आणि अकोल्याच्या अस्सल रसिकतेचा परिचय दिला शहरातील जाणोळकर मंगल कार्यालय येथे हे कवी संमेलन रंगले पूर्वार्धात अकोला जिल्ह्याचे सुपुत्र कवी अनंत राऊत यांचा व त्यांच्या कुटुंबाचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. त्यानंतर रंगलेल्या कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रभरातून आलेल्या लोकांनी आपल्या एकशे बढकर एक कवितांनी रंगत आणली. नितीन देशमुख यांनी आपल्या अनोख्या शैलीत जळणाऱ्याला विस्तव कळतो ही गझल सादर करत मैफिलीला सुरुवात केली आणि अक्षरशः पाय टाकायलाही जागा नसलेल्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला...बाहेर रिमझिम पाऊस आणि आत मध्ये टाळ्यांचा पाऊस सलग चार तास पडत राहिला... युवा कवी गोपाल व्यापारी यांनी आपल्या बहारदार निवेदनाने या मैफिल्ला आणखी उंचीवर नेले. यवतमाळचे कवी जयंत चावरे यांनी माय असावी साऱ्याले ही कविता सादर ते केली तेव्हा अनेकांच्या पापणीच्या कडा होऊ लावल्या होत्या. हास्य कवी नितीन वरणकर यांनी कमाल आहे बाई ही राजकीय व्यंग असलेली कविता सादर करून रसिकांना लोटपोट केले. शेतीमातेची कवी शरद धनगर यांनी अहिराणी तर आबेद शेख यांनी आपल्या समजू नको ढगा तू या कवितांमधून अख्या सभागृहाला उभे राहून दाद द्यायला भाग पाडले उत्तरोत्तर रंगत गेलेल्या कविसंमेलनात प्रा.संजय कावरे,स्नेहल सोनटक्के, विशाल मोहिते, विशाल खोंदले, विशाल उशिरे, महेश होनमाने यांनी रसिकांनी थांबण्यास भाग पाडले. गारवा मित्र मंडळ व अनंत राऊत मित्रपरिवार यांच्या वतीने हा सुंदर कार्यक्रम अकोल्यात आयोजित करण्यात आला होता.
Post Views: 122