दिव्यांग रोजगारासाठी टी.व्ही फेम कलावंतांची मैफिल
दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चा पुढाकार
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
19 May 2022, 11:46 AM
अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांगांसाठी निरंतर सामाजिक उपक्रम भारतभर राबवले जातात.दिव्यांगांच्या रोजगारासाठी अकोल्यात स्थायी स्वरूपात प्रशिक्षण कार्यशाळा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने मल्टिनॅशनल कंपनीसोबत दिव्यांग सोशल फाउंडेशनने सामंजस्य करार केला आहे. या ट्रेनिंग सेंटर मध्ये दिव्यांगांना प्रशिक्षित करून नोकरी व व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.या उपक्रमात १२ जून २०२२ रोजी सायं. ६ वा. खुले नाट्यगृह,गांधी रोड अकोला येथे टीव्ही फेम कलावंतांची मैफिल आयोजित केली आहे. या चॅरिटी शो मध्ये सारेगमप फेम गायिका श्रुती भांडे, सुर नवा ध्यास नवा फेम स्नेहल चव्हाण व दख्खनचा राजा ज्योतिबा फेम अभिनेत्री प्रतीक्षा देशमुख आपली कला सादर करणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमात दिव्यांगांना व्हीलचेअर,कर्ण यंत्र, व्हाईट केन, ब्रेल बुक्स, शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. सदर कार्यशाळेत दिव्यांगांची नोंदणी करण्यासाठी व चॅरिटी शो ची देणगी प्रवेशिका प्राप्त करण्यासाठी संस्थेच्या हेल्पलाईन नंबर 9423650090 वर संपर्क साधावा, असे आव्हान आयोजन समितीचे प्रसाद झाडे,अनामिका देशपांडे,भारती शेंडे, वंदना तेलंग, प्रसन्न तापी ,मनोज कसुरकर व स्वाती झुनझुनवाला यांनी केले आहे.
Post Views: 256