अकोला- महापालिकेतील नव्या प्रभाग रचनेनुसार 11 नगरसेवक वाढले आहेत. महापालिकेतील सभागृहाची रचना पाहता 91 नगरसेवकांची आसन व्यवस्था होणे शक्य दिसत नाही. यासाठी प्रशासनाच्या स्तरावर कुठल्याही हालचाली सुरु नसल्याची परिस्थिती आहे. निवडणुका तोंडावर आल्या असुन कुठल्याही क्षणी राज्य निवडणुक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करु शकते.
महापालिकेत सद्यस्थितीत दोन सभागृह आहेत. दोन्ही सभागृहात जुन्या रचनेनुसार नगरसेवकांची आसन व्यवस्था आहे. मात्र, बर्याचदा नगरसेवकांना, अधिकार्यांना व प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना बसण्याच्या अडचणी येतात. नव्या प्रभाग रचनेनुसार महापालिकेत 91 नगरसेवक असुन 11 नगरसेवक वाढले आहेत. त्यामध्ये स्वीकृत नगरसेवकांची भर पडुन ही संख्या 16 होणार आहे. महापालिकेतील मोठ्या सभागृहातील आसन व्यवस्था पाहता येथे 96 नगरसेवकांची आसन व्यवस्था होणे कठीण दिसत आहे. या सभागृहातील आसन व्यवस्थाही (फर्निचर) अतिशय दयनीय झाली आहे. यानंतरही प्रशासन स्तरावर वाढीव व्यवस्था करण्यासाठी कुठल्याही हालचाली सुरु असल्याचे दिसत नाही. ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असून अद्यापपर्यंत याविषयीचा कुठलाही प्रस्ताव तयार केला नसल्याची माहिती आहे. सर्वसाधारण सभेत अनेकदा अधिकार्यांना व प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना बसण्याची व्यवस्था नसते हे चित्र नेहमीचेच झाले आहे. अशीच आसन व्यवस्था जर यापुढे राहली तर नव्या सभागृहातील 96 नगरसेवकांची बैठक कशी होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. सभागृहाचा हॉल नेमकाच असल्याने याठिकाणी आसन व्यवस्था होणे कठीण आहे, वाढीव बांधकाम होणेही कठीण आहे.
Post Views: 310
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay