जळगांव (शैलेश पाटील)---
उद्योजक प्रसाद सूर्यवंशी
यांनी एका प्रायव्हेट कंपनीची
स्थापना करून कुशल
तंत्रज्ञानासोबत उत्कृष्ट दर्जाच्या
पीव्हीसी पाइपांची निर्मिती
करून उद्योगाची मुहूर्तमेढ
रोवली आहे. जळगाव जिल्ह्यासह मराठवाडा विभागातही कंपनीचा विस्तार
करून त्यांनी या व्यवसायाची
भरभराट केली आहे.
उत्पादन व मार्केटींग क्षेत्रातील प्रगल्भ
अनुभवांचा वापर करून आपला
व्यवसाय (कृषी सम्राट उद्योग)
भारतभर व सातासमुद्रापार झळकविण्याचे
स्वप्न पाहत श्री. प्रसाद सूर्यवंशी यांनी आपली
वाटचाल सुरू केली आहे. प्रगतीशिल शेतकरी,
कृषी क्षेत्राशी संलग्न अशा सूर्यवंशी कुटूंबात
श्री. प्रसाद सूर्यवंशी यांचा जन्म ६ मे १९९८
ला झाला. आजोबा अण्णासाहेब जे. के. पाटील
(सूर्यवंशी) हे कृषी अधिकारी होते. त्यामुळे घरातच लहानपणापासून कृषीचे
त्यांच्यावर झाले. शेती क्षेत्राविषयी आवड व भारतातील शेती विषयक प्रगत तंत्रज्ञानाबाबत जागरूकता याच्या आधारावर कृषी सम्राट संस्कार गृपची स्थापना २६ जानेवारी १९९६ ला केली.
यात तणनाशके, बुरशीनाशक, कीटकनाशके
सूक्ष्म अन्नद्रव्य, दुय्यम अन्नघटके
व विद्राव्य खते यांची
उत्पादने घेण्यास
सुरवात केली. त्यांची
विक्री आज संपूर्ण
महाराष्ट्रात केली
जाते. या व्यवसायात
त्यांनी आपल्या पाल्यांनाही
शासकीय नोकरीचा राजीनामा
द्यायला लावून, कृषी क्षेत्रावरील व्यवसायाकडच्या
वाटचालीस सुरवात केली. श्री. प्रसाद यांचे
शिक्षण आयसीएसई अनूभूती स्कूल (जळगाव)
पुढे एमबीए मार्केटिंग पुणे येथील एमआयटी
कॉलेजमध्ये पूर्ण केले. त्यांनीही नोकरीच्या मागे
न लागता, आपल्या आजोबा, वडिलांनी सुरू केलेला व्यवसायाचा वसा घेतला. आपल्या परिवाराच्या व्यवसायाशी संलग्न अशा पी.व्ही. सी. पाईप निर्मिती या क्षेत्रात दृष्टी वळविली. आधुनिक तंत्रज्ञानाची जाण, मार्केटिंग क्षेत्रातील उच्च पदवी, उत्तम प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, टीम हाताळण्याचे कौशल्य, उत्पादनाची आधुनिक यंत्र सामुग्री, आधुनिक प्रकारची
प्रयोग शाळा (लॅब) यांच्या साहाय्याने पी. व्ही. सी. पाईप उत्पादनासाठी क्लिऑन इंडस्ट्रीज, एल-१८, एमआयडीसी, जळगाव येथे सुरू केली. ही कंपनी २७ फेब्रुवारी २०२२ ला सुरू केली. आज कंपनीत अत्यंत उत्कृष्ठ दर्जाचे ६३ एम.एम., ७५ एम.एम., ९० एम.एम. ११० एम.एम.एवढ्या प्रकारच्या पाईपांची निर्मिती सुरू आहे. कंपनीने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास केला संपादन आहे. सूर्यवंशी सम्राट प्रसाद यांचा अत्यंत शांत स्वभाव, कॉम्युटर क्षेत्रातील त्यांचे प्रगल्भ ज्ञान असल्याने त्याचा फायदा कंपनीच्या वाटचालीत त्यांना होत आहे. लक्ष्मी केमीकल्स प्रायव्हेट लिमीटेडच्या उत्पादनाच्या मार्केटिंग संचालक म्हणूनही ते काम पाहत आहे. सामाजिक कार्यात श्री सूर्यवंशी यांचा पुढाकार असतो.