नायफड केंद्रात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी स्पर्धांचे आयोजन
पुणे : covid-19 नंतरच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नायफड केंद्रात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने विविध केंद्रस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
सर्व स्पर्धा गटशिक्षण अधिकारी संजय नाईकडे पंचायत समिती खेड यांच्या प्रेरणेने व जीवन कोकणे विस्ताराधिकारी बीट डेहणे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाल्या.
जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता १ली ते ५वी (छोटा गट),६ वी ते ८वी (मोठा गट) यांच्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि सामान्य-ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. छोट्या गटातील विद्यार्थ्यांसाठी.निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक जानवी वाघमारे शाळा-शेंदूर्ली, द्वितीय क्रमांक जाधव-डेहणे, तृतीय क्रमांक अक्षदा शेळके-खडकवाडी, वक्तृत्व स्पर्धा प्रथम नयना कुमार-डेहणे , शुभम जोशी -खडकवाडी,गौरी सोळसे -वांजळे आणि प्रश्नमंजुषा व सामान्य-ज्ञान स्पर्धा प्रथम क्रमांक सार्थक ठोकळ-
सरेवाडी,द्वितीय क्रमांक सोहम जाधव-डेहणे, तृतीय क्रमांक समृद्धी कौदरे-डेहणे ह्याप्रकारे क्रमांक विद्यार्थ्यांनी पटकाविले.
केंद्रात मोठी शाळा स्पर्धेत मोठ्या गटात नायफड शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकाविले. कार्यक्रमाचे नियोजन डेहणे शाळेतील मुख्याध्यापिका जयश्री सातकर शिक्षक दुलाजी तिटकारे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्राचे केंद्रप्रमुख भरतराव लोखंडे यांनी केले. कार्यक्रम कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना खेड तालुक्याचे प्रेरणादायी गटशिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षीस वाटप बाळासाहेब दुंडे सरचिटणीस पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे आचार्य दोंदे वस्तीगृह यांसकडून करण्यात आले. कार्यक्रमास अरुण असवले, अशोक फसले, राजू राठोड, देवेंद्र कोकाटे,हिना शहा,भास्कर. बुरसे आणि धनराज अचवलकर शिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बापूराव दराडे सूत्रसंचालन विजयकुमार शेटे व आभार संभाजी सरड यांनी मानले.
Post Views: 617