एल.आर.टी. मध्ये संविधान उद्देशिका वाचन कार्यक्रमाचे आयोजन
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
27 Nov 2024, 11:24 AM
दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोला द्वारा संचालित श्रीमती एल.आर. टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील एन.सी.सी. युनिट तसेच एन.एस.एस. युनिट तर्फे दि. २६ नोव्हेंबर, २०२४ रोजी संविधान उद्देशिकाचे वितरण व वाचन कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे एन.सी.सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर व एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. नागनाथ गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची. यांनी उपस्थित एन.सी.सी. कॅडेट्सला व विद्यार्थ्यांना संविधान उद्देशिका वितरित करून त्याचे वाचन केले. तसेच त्यांनी संविधान दिवसाचे महत्त्व समजून सांगितले. तसेच यांनी संविधान दिवस का साजरा केला जातो, संविधान कोणी लिहिले, संविधान सभेचे प्रमुख कोण व संविधान दिवस कश्याप्रकारे भारतीय लोकशाहीचे महत्त्व सांगतो याबद्दल कैडेट्सला मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. जी.जी. गोंडाणे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व सांगितले. तसेच २६/११ या दिवसाला मुंबई येथील ताज व ओबेरॉय हॉटेल वर झालेल्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुद्धा यावेळी घेण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. मोनिका साबू यांनी केले. या कार्यक्रमाला दि. बी.जी.ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमारजी तोष्णीवाल, उपाध्यक्ष इंजि. अभिजितजी परांजपे, मानद सचिव डॉ. पवनजी माहेश्वरी, सहायक सचिव सी. ए. विक्रमजी गोलेच्छा सर्व कार्यकारी सदस्यांचे सहकार्य लाभले. संविधान उद्देशिका वाचन या कार्यक्रमाला वरिष्ठ तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व प्रशासकीय कर्मचारी व एन.सी.सी. कॅडेट्स व एन.एस.एस. चे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Post Views: 69