बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यास जिल्हाप्रशासनाची अर्थपूर्ण टोलवाटोलवी !
बेकायदेशीर सुरू असलेल्या जेमिनी जीम सेंटरमुळे नागरिक त्रस्त
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
24 Oct 2023, 1:38 PM
बोईसर - (संतोष घरत) - जिल्ह्यात बेकायदेशीर बांधकाम फोफावत असून या बांधकामाला कुठलीच परवानगी नसताना शासनाचा महसूल अधिकाऱ्यांचा तिजोरीत जमा करून लाखो रुपयांचा धनी असलेले बांधकामधारक आज बेकायदेशीर उद्योगधंदे करून नागरिकांना नाहक त्रास देत आहेत.
बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील दिजय नगर सर्वे क्रमांक १७१/५ (४६५.०० चौ मी) हा रहिवास भूखंड डॉ रमेश धनराज चांगरानी यांनी दिनांक २६/९/२०१४ साली रमजान कानजी दोडीया, फरीदा रमजान दोडीया व करीम रमजान दोडीया यांना विकलेला असून तशी नोंद महसूल दप्तरी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद पालघर यांच्याकडून दिलेल्या सुधारीत बांधकाम परवानगी नुसार सदर भूखंडाच्या तळ मजल्यावर दर्शनी भागात वाणिज्य स्वरूपाचे ६ दुकानी गाळे व मागिल बाजूस दोन रहिवास प्रयोजनार्थ म्हणून सदनिका, पहिल्या मजल्यावर रहिवास प्रयोजनार्थ व दुसऱ्या मजल्यावर रहिवास प्रयोजनार्थ अश्या प्रकारे मंजुरी देण्यात आली होती. परंतु दोडीया यांनी प्रस्तुत भूखंड हा ज्या प्रयोजनार्थ करता मंजूर आहे त्या प्रयोजनार्थ वापर न करता भूखंडावरील संपूर्ण इमारतीत जेमिनी जीम सेंटर सुरू करून बेकायदेशीर वाणिज्य वापर सुरू केलेला असून या इमारतीत कुठल्याही प्रकारचे वाहनतळ नसल्यामुळे जीम सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांचे चार चाकी व दुचाकी वाहान रस्यावर पार्किंग करत असल्यामुळे दिजय नगर ते नाईक नगर, गणेश नगर, काटकर पाडा, वंजार वाडा येथे जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अनेकवेळा भांडणतंटे निर्माण होऊन कायदा सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती उद्भवली होती.
सदर भूखंडावरील बेकायदेशीर बांधकामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात पालघर व जिल्हा परिषद पालघर यांना तक्रार देऊन देखील कागदी घोडे नाचविणारे अधिकारी दोन वर्षांपासून या बेकायदेशीर बांधकामांवर व बेकायदेशीर जेमिनी जीम सेंटरवर कारवाई करण्यास टोलवाटोलवी करत असल्याचे दिजय नगर फेडरेशनचे रहिवासी तक्रारदार सुशांत संखे यांनी सांगितले आहे
Post Views: 132