मध्य प्रदेशातील प्रसिद्ध राष्ट्रसंत भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी इंदूर कोर्टात शुक्रवारी अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने विनायक, चालक शरद आणि केअरटेकर पलक यांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाकडून आरोपींना सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सेवेदारांनी पैशासाठी दिला त्रास, महाराजांना केलं आत्महत्येस प्रवृत्त
मिळालेल्या माहितीनुसार, साडेतीन वर्षांच्या सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. उच्च न्यायालयाने हा गुन्हा सिद्ध केला आहे. महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी महाराजांचे सेवक शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक यांना शिक्षा सुनावली. आरोपी पैशासाठी महाराजांचा छळ करत असे, हे न्यायालयाने मान्य केले. त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेलही करण्यात आले. भैय्यू महाराजांना कुटुंबापेक्षा जे सेवेदार होते, ज्यांच्यावर त्यांचा एवढा विश्वास होता की त्यांनी त्यांचा आश्रम आणि काम त्यांच्याकडे सोपवले होते, त्याच सेवेदारांनी त्यांना पैशासाठी एवढा त्रास दिला की त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले.
32 साक्षीदारांची सुनावणी
मिळालेल्या माहितीनुसार, साडेतीन वर्षांच्या सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. 32 साक्षीदारांची सुनावणी झाली. 150 सादर केले. उच्च न्यायालयाने हा गुन्हा सिद्ध केला आहे. महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी महाराजांचे सेवक शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक यांना शिक्षा सुनावली. आरोपी पैशासाठी महाराजांचा छळ करत असे, हे न्यायालयाने मान्य केले. त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेलही करण्यात आले.
भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वतःच्या कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली होती. भैय्यू महाराजांना कुटुंबापेक्षा जे सेवेदार होते, ज्यांच्यावर त्यांचा एवढा विश्वास होता की त्यांनी त्यांचा आश्रम आणि काम त्यांच्याकडे सोपवले होते, त्याच सेवेदारांनी त्यांना पैशासाठी एवढा त्रास दिला की त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले.असे न्यायालयात स्पष्ट झाले आहे.
Post Views: 461
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay