अकोला - उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय कार्यालय, अकोला तर्फे आयोजित महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन २०२२ अंतर्गत ग्रंथोत्सवाचे आयोजन दि. १० व ११ डिसेंबर २०२२ रोजी राजराजेश्वरी नगरीमध्ये श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथे करण्यात आले. वाचन संस्कृती समाजात विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी सदर ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथ प्रदर्शनी व ग्रंथ विक्री हा या ग्रंथोत्सावाचा मुख्य केन्द्र बिंदू होता. विविध बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन या निमीत्याने करण्यात आले होते. दोन दिवसीय कार्यक्रमाची सुरूवात ग्रंथ दिंडी, ग्रंथ पुजन, समारंभ, जेष्ठ साहित्यीक रंगकरणी मधू जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. अळम-धळम हास्य स्पर्धा हे कवी संमेलन ग्रंथोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. अळम-धळम कवी संमेलनाचे अध्यक्ष हास्य सम्राट राजाभाऊ देशमुख (कवठळकर) हे होते. अध्यक्ष महोदयांनी होई नावाची कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. अंकुर साहित्य संघाचे केंन्द्रीय अध्यक्ष हिमंत ढाळे यांनी बायकोचा पाळण सादर करून स्त्रोत्यांमध् ये हास्य कल्लोळ निर्माण केला. अळम-धळम या लोकप्रिय सदरचे लेखक धिरज चावरे सरांनी फुटक्या नशीबाचा आढावा घेत हास्याचे फवारे उडविले. चाचोंडी येथील मराठी कवी देवलाल तायडे यांनी शेतकऱ्यांचे दुःख कवीतेतून मांडले तर मामा तुमच्या पोरी संग फसलो लग्न करून ही कवी प्रशांत वरईकर यांनी सादर करून स्त्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. रसिकांच्या मनात अविसरणीय घर करणारा अळम-धळम हास्य तडका कवी संमेलन पार पडले. सदर कवी संमेलनाचा मनमुराद अरवाद शिक्षक मतदार संघाचे वि. आमदार किरणराव सरनाईक यांनी घेतला व अळम-धळम टीमचे कौतुक केले. शिक्षणाधिकारी माध्य. जि. प. अकोला श्रीमती सुचिता पाटेकर यांनीही शुभेच्छा दिल्यात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अकोला ग्रंथपाल अतुल वानखडे यांनी कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले. ग्रंथत्सोव २०२२ चे आयोजन राजेश कोलते, अजय इंगळे, कैलास गव्हाळे, विनोद निंभोरकर, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी व कर्मचारी वृंद यांनी सदर कार्यक्रम परिश्रमपुर्वक पार पाडला. कवी संमेलनाचे सुत्रसंचालन हिमंत ढाळे सर व आभार प्रदर्शन मनोज देशमुख यांनी केले.
Post Views: 228
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay