वझेगाव येथे कुऱ्हाडीने वार करून एकाची हत्या
उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील हे मोठी घटना
निंबा -- बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत वझेगाव येथील शेत शिवारात कुऱ्हाडीने वार करुन एकाची हत्या केल्याची घटना १६ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. श्रीकृष्ण शंकर माळी वय ५५ असे मृताचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वझेगाव शेत शिवारात वझेगाव येथील रहिवासी श्रीकृष्ण शंकर माळी यांची हत्या झाल्याची माहिती उरळ पोलिस स्टेशन चे ठाणेदार गोपाल ढोले यांना देण्यात आली होती.माहिती मिळताच ते आपला ताफा घेऊन वझेगाव येथे घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती घेऊन पंचनामा करून मृतदेह अकोला येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेचे गांभीर्य पहाता ठाणेदार ढोले य
यांनी डॉग स्टॉक युनीटसह घटनास्थळाचा पंचनामा केला अज्ञात आरोपी फरार असून त्याचेविरूध्द उरळ पोलीस स्टेशन मध्य गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश कायंदे व पोलीस कर्मचारी करीत आहेत
Post Views: 620