लोकस्वातंत्र्यचे वैभव हराळ यांचेकडून श्रीगोंदा कौटील्य अॕकॕडेमीला आर्थिक मदत
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2025-02-08
श्रीगोंदा :लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा संघटन प्रमुख प्रमुख वैभव हराळ व यांनी आपला व्यक्तिगत निधी म्हणून श्रीगोंदा,येथील कौटील्य अकॅडमी साठी रुपये पाच हजार देऊन, गरीब गरजू विद्यार्थ्यांना सहकार्य व्हावे म्हणून लायब्ररीमध्ये पुस्तकांसाठी सहकार्य म्हणून रू.५००० ची मदत जमा केली आहे.सहकार्याने अनेक युवकांच्या समस्या सुटतील पैशाच्या आभावाने मुलांना शिक्षण स्पर्धा परीक्षेसाठी हतबल व्हावे लागत आहे.शिक्षण घेणे गरजेच आहे.हा युवा वर्ग पोलिस, आर्मी ,नेव्ही , साठी या अकॅडमी मध्ये घडवला जातो.काही विद्यार्थ्यांकडे कौशल्य असून सुद्धा काही समस्या सुटत नाहीत.पैश्या अभावी शिक्षण होत नसल्याचे पाहून धुमाळ सर देखील खूप गरजू विद्यार्थ्यांना फि मध्ये सूट देत आहेत. हा उपक्रम विद्यार्थी आणि देशाच्या देशाच्या हिताचाच ठरेल.एक सैनिक हा एक लाख जनतेचे संरक्षण करणार आहे . जो विद्यार्थी प्रशिक्षण घेण्यास धडपडतो आणि भारत देशाबद्दल प्रेम बाळगतो अश्या सर्व विद्यार्थ्यांना लोकस्वतंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा संघटन प्रमुख वैभव हराळ हे नेहमीच दोन हाताने सहकार्य करण्याचे काम करत असतात .
Post Views: 215