गायत्री परिवारच्या भगिनींना राजमाता जिजाऊ आदर्श पुरस्कार
अकोला : गायत्री संस्कार केंद्र कृष्ण नगरी कौलखेड अकोला येथे श्रीमती यामिनी दीदी उपाध्याय व सौ रजनी ताई अजय उपाध्याय यांना वर्ष २०२२ चा राजमाता जिजाऊ आदर्श पुरस्कार भा ज पा अकोला महानगर सरचिटणीस श्री प्रफुल्ल कानकिरड व अकोला महानगरपालिका नगरसेवक श्री धनंजय धबाले हस्ते प्रदान करण्यात आले.
यामिनीदीदी मागील २८ वर्षां पासून कृष्ण नगरी कौलखेड अकोला येथे निशुल्क रविवारीय बालसंस्कार वर्ग चालवीत आहे तसेच सौ रजनीताई अजय उपाध्याय मागील २० वर्षा पासून गायत्री संस्कार केंद्र घरोघरी गायत्री दीपयज्ञ, गायत्री यज्ञ ,संस्कार, गर्भसंस्कार, याची सेवा आपले घर परिवार सांभाळून सुंदर रीतीने करीत आहे यमिनी दीदी हिंदू ज्ञानपीठ शाळेत शिक्षिका आहे आज त्यांच्या संस्कार वर्गात सेकंड जनरेशन पीढी येत आहे या दोन्ही नणंद भावजाई निःशुल्क निस्वार्थ पणे गुरूकार्य समजून भावी पीढी निर्माण मध्ये आपले समाज ऋण देत आहे.
अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार साधना, स्वास्थ्य, शिक्षा, स्वावलंबन, महिला जागरण, पर्यावरण, व्यसनमुक्ती व कुरीती उन्मुलन अभियान सप्तक्रांती वर काम करीत आहे या दोन भगिनी आपल्या कौलखेड गायत्री परिवार महिला मंडळ चे नेतृत्व करीत व्यक्ती, परिवार, समाज निर्माण मध्ये सेवा करीत आहे
भावी पिढी सुसंस्कारवान करण्याची प्रथम जवाबदारी मातेची आहे या साठी आओ गढे सुसंस्कारवान पीढी या अभियानात, गर्भसंस्कार अभियानात यशस्वी पणे कार्यकरित आहे गायत्री संस्कार केंद्रात आयोजित छोटेखानी सत्कार समारंभात आशाताई काटोले, वंदना फाटे, नीता दिवनाले, संध्या टाकसाळकर, योगिता सातपुते, प्राची टाकसाळकर, किशनराव मोरे, मनिषा दीदी,शीतल फाटे, शीतल सावके,पल्लवी चवरे , भातुलकर ताई, धवस ताई, सुप्रिया सातपुते यांनी या दोन्ही भगिनीचे अतुलनीय सेवाकार्य बद्दल मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन डॉ अजय उपाध्याय यांनी केले श्री गुरुदेव सेवा मंडळ कौलखेड, गायत्री परिवार महिला मंडळ, गायत्री परिवार कौलखेड युवा प्रकोष्ठ यांनी अभिनंदन सोहळा चे सफलते साठी परिश्रम घेतले.
Post Views: 147