बोईसर मुख्य रस्त्यावर रिक्षावाल्यांची दबंगगिरी...


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  20 Jan 2025, 8:27 AM
   

संतोष घरत - जिल्हा प्रतिनिधी 
बोईसर ! बोईसर तारापूर या मुख्य रस्त्या जवळ दिजयनगर ह्या ठिकाणी आज रिक्षावाल्याने दबंग गिरी दाखवून प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण तयार केलेले बघायचं मिळाले.
शुक्रवार 17 जानेवारी रोजी सकाळी ११:५० च्या सुमारास  रिक्षांच्या वैयक्तिक कारणामुळे मारामारी झाल्याचे निदर्शनास आले. यामध्ये भर वस्तीत प्रवासी व गर्दीच्या मध्ये रिक्षा रस्त्यावर थांबून लाकडी दांडके, व लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू होती.वेळीच त्या ठिकाणी नागरिकांनी एकत्र येऊन ही मारामारी थांबवली अन्यथा मोठी दुर्घटना घडल्या असतील हेही तितकेच सत्य आहे . घडलेल्या घटनेचे नक्की कारण काय ते समजले नसले तरी हे केलेले कृत्य  निंदनीय असून अशा गुंडांना योग्य ती शिक्षा देणे गरजेचे आहे.
 संबंधित विभागाचा अशा गुंडांवर धाक नसल्याकारणाने ही प्रकरने घडत आहेत. अशी कुजबुज ऐकावयास मिळत आहे. असे निंदनीय कृत करणाऱ्या इसमास शोधून त्यांची चौकशी करून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून ह्यापुढे असे कृत्य करणाऱ्यावर वचक बसेल.

    Post Views:  66


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व