दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे संगीत कार्यशाळेचे आयोजन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  20 Dec 2024, 11:33 AM
   

अकोला - स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष व श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे सहयोगी प्राध्यापक डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबवले जात आहेत. *संगीत शिकण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे दि. २१ ते २५ डिसेंबर २०२४* दरम्यान संगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे . सदर ५ दिवसीय संगीत कार्यशाळेत संगीताचे प्रारंभिक ज्ञान, चित्रपट संगीत, सुगम संगीताचे गायन वादन व संगीत शास्त्रावर महत्वपूर्ण व्याख्यान तज्ञ मार्गदर्शकाकडून दिले जाणार आहे. या कार्यशाळेत अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या प्रारंभिक ते संगीत विशारद परीक्षेसाठी अभ्यास कसा करावा ? ऑनलाईन संगीताचे धडे कसे मिळवावे? केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय व इतर स्पर्धा परीक्षेत संगीत विषय घेऊन नोकरी कशी मिळवावी ? या विषयावर डॉ.विशाल कोरडे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे .अपेक्षा अपार्टमेंट क्रमांक २, गणेश नगर,लहान उमरी,अकोला स्थित दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन सायं ५ ते ८ या वेळेत करण्यात आले आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींकरीता कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर नोंदणी करणे आवश्यक आहे.सदर मोफत आयोजित कार्यशाळेत अधिकाधीक दिव्यांग,महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान आयोजन समितीचे, अनामिका देशपांडे, अस्मिता मिश्रा व प्रा.अरविंद देव यांनी केले आहे.

    Post Views:  82


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व