बोईसर (संतोष घरत) : पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामंचा सुळसुळाट चालू आहे, परंतु महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे जनतेकडून बोलले जात आहे.
पालघर मधील सरावली - पांचली च्या हद्दीमध्ये सरावली पुलाच्या (ब्रिजच्या )दोन्ही बाजूस खजान जागेवर भूमाफियांनी जमिनी विकत घेऊन त्या ठिकाणी सपाटीकरण (लेवल )करून काही काळानंतर त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम होईल ह्या मध्ये शंकाच नाही.
सरावली ब्रिजच्या दोन्ही बाजूला जे काम चालू आहे ती जागा सरकारी (खजान ) स्वरूची असून शासनाची कुठल्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता त्या जमिनीवर सपाटीकरण चालूअसून मोठ्या प्रमाणात भराव करून शासनाचा महसूल बुडविला आहे . काम सुरु असलेल्या जागेजवळून दररोज येणाऱ्या अधिकारांच्या नजरेसमोरून जात असली तरी त्या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्याने सदर जमिनी कडे जाणीवपूर्वक लक्ष न दिल्याने त्या ठिकाणी पुढे अनधिकृत बांधकाम होऊन, समुद्राचे पाणी जाण्यास जागा न मिळाल्याने ते सर्व पाणी हे तेथील पारिसरातील गावामध्ये शिरण्याची शक्यता आहे . वेळेसच सदर सपाटीकरण करण्याचे काम बंद करून त्या भू माफिया वर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे जनतेचे म्हणणे असून सदर म्हणण्यावर महसूल विभाग काय कारवाई करणार हे बघणे औचित्याचे ठरेल.
Post Views: 363