नागपूर येथे जाऊन अकोल्यातील सेवानिवृत्त शिक्षकांनी आपले अधिकाऱ्याप्रती व्यक्त केली कृतज्ञता


 विश्वप्रभात  12 Nov 2025, 6:56 PM
   

अकोला -  नागपूर महापालिका येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून मार्चमध्ये बदलून गेलेल्या अकोला जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख कार्यकारी अधिकारी  वैष्णवी बी ( आय. ए. एस.)  यांचेप्रती अकोल्यातील सेवानिवृत्त शिक्षकांतर्फे अकोला जिल्हा परिषदेतील कामगिरीबद्दल आठ महिन्यांनंतर का होईना भेट घेऊन  आभार व्यक्त केले व कृतज्ञता व्यक्त केली.  पेन्शनर टीचर्स फोरम, जिल्हा अकोला या सेवानिवृत्त शिक्षकांच्या संघटनेमार्फत हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
      याप्रसंगी करुणा जुनघरे यांचे हस्ते श्रीफळ व गुच्छ देऊन  वैष्णवी बी यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. वयोवृद्ध शिक्षकांनी इतक्या दूरवर येऊन आपले कार्याची जाणीव ठेवली याबद्दल वैष्णवी बी यांना खूप आनंद झाला व त्या भावनिक झाल्या. सर्वश्री अशोक तुळशीराम राऊत, दिगंबर किसन शिंदे, जुनघरे सर, गजानन ताकवाले, दिनकर पोरे ,  श्रीकृष्ण कुकडे, अरुण वाघमारे उपाख्य आबा, ज्ञानदेव शेगोकार, विलास नन्नावरे,  विजय उदेभान गाडगे प्रभूती याप्रसंगी उपस्थित होते. आपले प्रस्तावनेत पेन्शनर टीचर्स फोरमचे अध्यक्ष जयंत घाटोळ यांनी वैष्णवी बी  यांची लवकर मंत्रालयात ग्रामविकास सचिवपदी पदोन्नती होवो अशा शुभेच्छा दिल्यात व अकोल्यातील कार्यकाळात सेवानिवृत्त शिक्षकांप्रती दाखविलेलेल्या संवेदनेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. वैष्णवी बी यांचे कार्यकाळात त्यांनी जिल्हा परिषदेला विशेषतः शिक्षण विभागाला लावलेली शिस्त, सेवाज्येष्ठतेच्या प्राधान्यक्रमानेच लाभ देण्याची कठोर अंमलबजावणी, भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर वचक, दलाली पद्धतीवर नियंत्रण, रखडलेल्या राशींचे त्वरित वाटप इ. कार्याची उजळणी केली. याप्रसंगी घाटोळ यांनी  वैष्णवी बी व सुचिता पाटेकर (तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी) या जोडगोळीची मुक्त कंठाने प्रशंसा केली. 
   या कार्यक्रमाचे संचलन अशोक राऊत यांनी केले तर आभारप्रदर्शन राम किसन शिंदे यांनी केले.

    Post Views:  48


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व