महर्षी कर्वे शिक्षण संस्थेत विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
19 Jan 2023, 9:47 AM
पुणे - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूल मध्ये स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नरेंद्र दत्त यांना स्वामी विवेकानंद असे नाव राजस्थान मधील शेखावटी याठिकाणचा राजा, अजित सिंह यांनी दिले. आपल्या देशाला जर ओळखायचे असेल तर स्वामी विवेकानंद यांना ओळखले पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला आपले कुटुंब मानले होते. त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र उठा जागे व्हा आणि जोपर्यंत आपले कार्य पूर्ण होत नाही, तोपर्यंत सतत प्रयत्न करीत रहा.
विवेकानंद म्हणत असत जर आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर मन एकाग्र करा. स्वामीजी हे चिरंजीवी युवा आहेत, म्हणूनच आपण 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती, हा दिवस, युवा दिन म्हणून साजरा करतो. म्हणून सर्व भारतीय तरुणांनी स्वामीजींचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
संस्कृत पंडीत उमेशजी पान्डेय यांनी सांगितले. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे, उपमुख्याध्यापक विष्णू मोरे, पर्यवेक्षक संजय रायपूरकर तसेच सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. युवा दिनाचे औचित्य साधून प्राध्यापक निरगुडकर सर यांची राज्यपाल यांनी एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या सिनेट पदी सदस्य म्हणून नियुक्ती केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
Post Views: 242