समाजकार्य महाविद्यालयात कौटुंबिक हिंसाचार या विषयावर पेपर वाचन व पटनाट्य कार्यक्रम संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
13 Oct 2022, 1:05 PM
ग्रामीण विकास शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ द्वारा, संचालित श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी, येथे BSW II,SEM,III च्या विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अभ्यासक्रमानुसार क्षेत्रकार्या अंतर्गत सामाजिक समस्येवर आधारित पेपर वाचन करावे लागते, करिता विद्यार्थ्यांनी कौटुंबिक हिंसाचार एक सामाजिक समस्या या, विषयावर पेपर वाचन व पटनाट्य महाविद्यालयात सादर केले,
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विचार मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संकेत काळे यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाकरिता शुभेच्छा दिल्या, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष कु. नम्रता मेश्राम MSW,II SEM- III ची विद्यार्थिनी व कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अॅड कांचन शिंदे ह्या विचार मंचावर उपस्थित होत्या, व त्यासोबतच कार्यक्रमाला विशेष उपस्थित म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.केशव गोरे व महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. डॉ.संदीप भोवते व गटाचे मार्गदर्शक प्रा.डाॅ. केतन वाकोडे. प्रा.डॉ. अर्चना धर्मे, प्रा. नवनाथ बडे इत्यादी, मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटाचे मार्गदर्शक प्रा. डॉ. केतन वाकोडे यांनी केले, व प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित असलेल्या अॅड कांचन शिंदे यांनी विद्यार्थ्यांना कौटुंबिक हिंसाचार एक सामाजिक समस्या या विषयावर कायदे व विविध उदाहरणे देऊन मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले, महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.केशव गोरे यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.संदीप भोवते यांनी विद्यार्थ्यांना कौटुंबिक हिंसाचार कश्या पद्धतीने होतो, याची ज्वलंत विविध उदाहरणे देऊन आपल्या वाणीतून व व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले,
तसेच BSW II,SEM-III च्या डॉ.केतन वाकोडे सर यांच्या गटातील विद्यार्थ्यांनी कौटुंबिक हिंसाचार एक सामाजिक समस्या या विषयावर उत्कृष्ट असे पटनाट्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकलेत
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सपना खंडारे यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी कार्यक्रमाला मोठ्या हर्ष उल्हासाने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कु. सपना खंडारे,कु. गायत्री राजकुवर कु.श्रेया देशमुख कु.धनश्री राठोड,अजय गायकवाड, विक्की इंगळे, ऋषिकेश नवलकार,समीर लोडम, जय मानकर, यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 186