निंबा सेवा सहकारी संस्थेला मध्यवर्ती बॅंकेकडून रू. १ लाखाचे चे अनुदान*


 संजय देशमुख  17 Jan 2022, 2:37 PM
   

निंबा  --  स्वत:च्या कार्यालयीन व सेवा व्यवहार कामाकाजासाठी सेवा सहकारी संस्थांना बांधकाम करण्यासाठी दि.अकोला जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून रू ५ लाखाचे कर्ज दिले जाते. त्यामध्ये या कामासाठी रू‌‌.१ लाखाचे अनुदान देण्याची बॅंकेची योजना आहे
          
   परंतू बाळापूर तालूक्यातील निंबा येथील सेवा सहकारी संस्थेने आपले तीन रूम चे बांधकाम स्वतःच्या नफ्यातून  केल्यामुळे या संस्थेला अनुदान मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
             परंतू तरीही संस्थेच्या संचालक मंडळाने पत्रव्यवहार  व प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नाला यश प्राप्त होऊन दि.अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकार बॅंकेने संस्थेची मागणी मान्य केली आणि रू.१ लाखाचा अनुदानाचे पत्र संस्थेला दिले आहे. 
              त्यानुसार  बँकेचे संचालक श्री राजीव राऊत व सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये एक लाख रुपये अनुदानाचे पत्र बँकेचे वरिष्ठ अधिकारी श्री तायडे यांनी संस्थेचे उपाध्यक्ष श्री विठ्ठल माळी आणि सचिव श्री ढोले यांना प्रदान केले.
               या कार्यक्रमामध्ये संस्थेच्या आतापर्यंतच्या सर्व अध्यक्षांचा व संस्थेला जागा देणाऱ्या डोंगरे कुटुंबियांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
               कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे वरिष्ठ निरीक्षक श्री डाबेराव यांनी केले .याप्रसंगी श्री राजूभाऊ राऊत, श्री श्रीकृष्णा  मोरखडे, श्री तायडे  आणि संस्थेचे अध्यक्ष श्री प्रमोद देशमुख यांनी आपली मनोगत व्यक्त केले 
          स्व. पांडूरंगआप्पा डोंगरे यांचे नाव संस्थेने दिल्याबद्दल  आयोजन त्यांचे सुपुत्र श्री गजानन भाऊ डोंगरे यांच्यातर्फे स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
         कार्यक्रमाचे संचालन श्री अरुण  घोरड यांनी तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य श्री धम्मपाल तायडे यांनी केले 
        अनुदानापोटी मिळालेले एक लाख रुपये आणि उर्वरित पैसे टाकून संस्थेकडून  बँकेच्या वर सोलर प्लांट बसविण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

    Post Views:  297


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व