कलेक्टर मॅडमची बॅग रेल्वेतून लांबवली GPS ने लोकेशन शोधलं काही तासांतच आरोपीला बेड्या


 संजय देशमुख  2022-01-10
   

 औरंगाबाद : रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला रेल्वेत चोरी करणं चांगलंच महागात पडलं. कारण यावेळी त्याची गाठ थेट चक्क प्रशिक्षणार्थी IAS अधिकाऱ्याशी पडली. मग काय पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने रेल्वे पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि अवघ्या २४ तासात आरोपीला जेरबंद करण्यात आलं आणि चोरीला गेलेला मुद्देमालसुद्धा सुरक्षितपणे परत मिळालाएकाच षटकात फलंदाजाला चक्क दोनदा बाद ठरवलं, पण तरीही तो खेळतच राहीला, असं कसं घडलं पाहा...

औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ( ०७ जानेवारी ) रोजी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी कृती राज (वय ३० वर्ष) रेल्वे क्रमांक १९४८४ च्या बोगी क्र. बी ३ मधून प्रवास करीत असतांना त्यांची सँगबॅग ज्यामध्ये लेनोओ कंपनीचा लॅपटॉप व इतर ऐवज असे एकुण १ लाख ७५ हजार रुपयांचे मुद्देमाल असलेली सँगबॅग कोणीतरी अज्ञात इसमाने ०२.३० ते ०३.३० वाजेच्या दरम्यान चोरुन नेली. याबाबतची माहिती RPF पोलीस इस्पेक्टर मीना यांनी तात्काळ भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विजय घेरडे यांना दिली. ज्यावरून घेरडे यांनी सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने तपासले असता चोरी करणारा व्यक्ती रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला राहुल सुभाजी रोकडे (वय २७ वर्ष रा गायत्री मंदीर, सुरजकुंड, खंडवा) असं असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.


त्यानंतर घेरडे यांनी राहुल रोकडेचा मोबाईल नंबर काढत सायबर सेलचे प्रभारी अधिकारी सपोनि जगताप यांना देऊन, आरोपीचं लोकेशन शोधून काढले. त्यानंतर याची माहिती घेरडे यांनी औरंगाबाद लोहमार्ग पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांना कळविली असता, त्यांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

त्यानुसार भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी राहुल सुभाजी रोकडे याला नारायण नगर, खंडवा येथून ताब्यात घेतले. सोबतच त्याने चोरी केलेला मुद्देमाल सुद्धा हस्तगत केला. तर भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीकरिता पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी प्रभारी अधिकारी विजय घेरेडे व त्यांचे तपास पथकास रोख १५ हजार रुपयांचे बक्षीस व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला.

    Post Views:  527


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व