महात्मा फुले विद्यालय गणेश नगर शाखेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
परभणी : महात्मा फुले विद्यालय, गणेश नगर शाखेत ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या परिसरात राष्ट्रभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला.
कार्यक्रमास संस्थेचे *सहसचिव अजयराव गव्हाणे साहेब, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. लखनसिंह जाधव सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. कैलासराव लोनसने, पर्यवेक्षक श्री. शिवाजीराव विरसे सर तसेच श्री. प्रदीप चव्हाण ** डॉ. मोरे सर श्री अरुणराव गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
*शिवणकर प्रतिष्ठानच्या वतीने गरीब, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री राजेंद्र मुंढे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले*. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार मिळाला असून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विविध महापुरुष, स्वातंत्र्यसैनिक व देशभक्तांच्या वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी तसेच आकर्षक लेझीम पथक हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. लेझीम पथकाच्या उत्साहपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नामदेवराव चापके सर व श्रीकांत नाईकवाडे* सर यांनी प्रभावीपणे केले.
सांस्कृतिक विभागाच्या वतीने *सौ. समृद्धी मस्के, सौ. सुतार मॅडम, सौ. पारवे मॅडम व सौ. पोले मॅडम* यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या शेवटी *आभार प्रदर्शन श्री. प्रदीप चव्हाण सर यांनी केले*. त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर, पालक, नागरिक, विद्यार्थी तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
???????? जय हिंद! जय भारत! ????????
Post Views: 4