अकोला : लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अखिल भारतीय स्तरावरील समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून विधान परिषदेतील नवनिर्वाचित आमदार श्री. वसंतजी खंडेलवाल यांचे अभिनंदन करून स्वागत करण्यात आले. तथा त्यांच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करून यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
संघटनेचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी संघटना पदाधिकार्यांसह शाल, ग्रामगीता व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांचेसोबत केंद्रीय सचिव राजेंद्र देशमुख, कोषाध्यक्ष किशोर मानकर, मार्गदर्शक प्रा. राजाभाऊ देशमुख, विदर्भ संघटक तथा संपर्क प्रमुख सिद्धेश्वर देशमुख, केंद्रीय पदाधिकारी अंबादास तल्हार उपस्थित होते. याप्रसंगी संघटनेच्या सेवाभावी उपक्रमांची आणि संघटना राबवित असलेल्या पत्रकार कल्याण व सामाजिक कार्य या अभिनव संकल्पनेची माहिती त्यांना देण्यात आलाी.
Post Views: 296
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay