४ बालकामगारांची मुक्तता आणि मालकावर गुन्हा दाखल
वाशिम : बालकामगार ठेवणे गुन्हा असतांनाही वाशिम येथे बालगारांकडून काम करून घेतले जात असल्याची माहिती मिळाल्यावरून कामगारविभाकडून तत्पर कारवाई करण्यात आली.यामध्ये श्री. गौरवकुमार नालिंदे सरकारी कामगार अधिकारी , व विनोद जोशी दुकाने निरीक्षक, वाशीम यांनी दि. १४ जानेवारी २०२२ रोजी सिंघम बेक निमजगा, केकतउमरा रोड, वाशीम येथे जिल्हा बालकामगार कृती दलाद्वारे धाड टाकून येथील एकुण ४ बालकामगारांची मुक्तता केली.यामध्ये दोषी असलेले आस्थापना मालक श्री. रमेश बनारसी मौर्या विरुद्ध वाशीम शहर पोलीस ठाणे, येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post Views: 180